चांदुर रेल्वे - (शहेजाद खान)-
चांदुर रेल्वे तालुक्यातील सोनगांव ग्रामपंचायत क्षेत्रात येत असलेल्या कृषी पंपाची वीज गेल्या चार दिवसांपासून चोवीस तास बंद राहत असल्याने आज संतप्त सोनगांव, कळमगाव, येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी चांदुर रेल्वे येथील विद्युत विभागाच्या उपअभियंता बीजवे यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलेत.
गेल्या 4 वर्षापासून आधीच शेतकरी दुष्काळात जगतो आहे. अशात यंदाही नुकताच दुष्काळाची घोषणा झाली असतांना आताच्या पिकांना जगवण्याची शेतकरी धडपड करतो आहे. मात्र अशात आता विद्युत विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. चांदुर रेल्वे तालुक्यातील सोनगांव ग्रामपंचायत परिसरातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पाऊस नसल्याने पीक करपली आहेत. तरीही अनेक दिवसांपासून विद्युत विभागाकडून 24 तास लोडशेडिंग केल्या जात असल्याने अखेर मंगळवारी शेतकरी संतप्त झालेत.
विद्युत विभागाकडून सकाळी 6 ते 9.30 वाजेपर्यंत लोडशेडिंग असल्याचे सांगितल्या जात असताना प्रमानाच्या बाहेर म्हणजेच अतिरिक्त लोडशेडिंगच्या नावाखाली सोनगांव परिसरात 24 तास लोडशेडिंग करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये सध्या संतप्त भावना व्यक्त केल्या जाताहेत.
यामध्ये सोनगांव ग्रामपंचायत मध्ये तात्काळ नियमित वायरमन कर्मचारी देण्यात यावा, सोनगांव ग्रामपंचायत परिसरातील ट्रान्सफार्मरची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी आणि शासनाच्या नियमांप्रमाणेच लोडशेडिंग करून इतर वेळेत शेतकऱ्यांची वीज पुरवठा बंद करण्यात येऊ नये अशा मागण्या यावेळेस करण्यात आल्या.
4 तासाच्या ठिय्या आंदोलनात उपअभियंता बीजवे यांनी ठिय्या आंदोलन करणाऱ्या सोनगांव वासीयांना लेखी उत्तर दिले असून 10 दिवसात ट्रान्सफार्मर दुरुस्ती सुरु करुन लोडशेडिंग नियमाप्रमाणे करून वीज पुरवठा खंडीत करणार नसल्याचे आश्वासन दिले आहेत. सोनगांव येथील ग्रामस्थांच्या ठिय्या आंदोलनामुळे अखेर विद्युत विभागाने मागण्या मान्य करीत सुधार करण्याचे आश्वासन दिल्याने ठिय्या आंदोलन माग घेण्यात आले.
यावेळी उमेश गोंढाणें, भानुदास गावंडे, राजू डहाके, प्रदीप वासणिक, गजानन आमले, अक्षय जामदार, रुपेश गडलिंग, मनोहर मरगडे, रोशन सरदार, सुधीर मेटे, सचिन कांबळे, यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment