पू. गुरूजींकडून सनातनच्या कार्याचे कौतुक
![]() |
बैठकीला उपस्थित पू. बापूजींचे साधक आणि अन्य कार्यकर्ते |
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या स्थानिक शाखेद्वारे बापूंच्या अमरावती आश्रमात पू. भिडे गुरूजींच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत श्री योग वेदांत सेवा समितीचे सचिव श्री. मानव बुद्धदेव, श्री. दयाराम राठोड, श्री. नंदलाल तरडेजा आणि श्री. रामेश्वर इंगोले यांनी गुरूजींचा श्रीफळ अन् पू. बापूजींची पुस्तके भेट देऊन सन्मान केला. पू. बापूजींच्या साधकांशी चर्चा करतांना त्यांनी वरील विधान केले.
सनातनच्या कार्याला जोड नाही, तोड नाही, उपमा नाही, बरोबरी नाही !
सनातन संस्थेविषयी बोलतांना गुरुजी म्हणाले, सनातनच्या कार्याला जोड नाही, तोड नाही, उपमा नाही, बरोबरी नाही. तसेच दैनिक सनातन प्रभात हे सत्यनिष्ठ असून ते भारतातील सर्वच भाषांमध्ये निघाले पाहिजे. सभेला मार्गदर्शन करतांना गुरूजींनी येत्या डिसेंबर महिन्यात आयोजित गडकोट मोहिमेत सहभागी होण्याचे उपस्थितांना आवाहन केले. या प्रसंगी गुरूजींनी क्षात्रतेज जागवणारी गीते सर्वांना सामूहिक म्हणायला लावली. सभेला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अभिषेक दीक्षित, श्री. महेश लढके, हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे, युवा सेवा संघाचे श्री. राहुल नेरकर तसेच अमरावती, बडनेरा, नागपूर, कारंजा, नेर, मोर्शी आदी अनेक शहरांतील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आणि विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, युवा सेवा संघ आदी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Om
ReplyDeleteOm
ReplyDeleteTruely said, soon he will be proven INNOCENT
ReplyDeleteTotal bogus case agnst Hindu saints registered during Congress regime; ex sc judge katju told that 50% judiciary is corrupt hence no relief for innocent saints
ReplyDelete