BREAKING NEWS

Sunday, November 27, 2016

हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांसह सभेला उपस्थित रहाणार ! - श्री. अनिल क्षत्रबंद, जिल्हा सरचिटणीस, मनसे, सोलापूर

श्री. बिज्जु प्रधाने-लोणारी (डावीकडून तिसरे)
यांना निमंत्रण आणि अंक भेट देतांना समितीचे
महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट
     सोलापूर- ४ डिसेंबर २०१६ या दिवशी होणारी हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांसह सभेला उपस्थित राहू, असे आश्‍वासन मनसेचे जिल्हा सरचिटणीस अनिल क्षत्रबंद यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने समितीचे श्री. विनोद रसाळ यांनी धर्मसभेचे निमंत्रण देण्यासाठी त्यांची भेट घेतली असता, क्षत्रबंद यांनी वरील आश्‍वासन दिले. या वेळी नवयुग सरगम फ्रेंड्स ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार उपस्थित होते.
समितीचे विनोद रसाळ मनसेचे सरचिटणीस
अनिल क्षत्रबंद यांना निमंत्रण देतांना


धर्मसभेला सर्वतोपरी साहाय्य करू ! 
-श्री. बिज्जु (आण्णा) प्रधाने-लोणारी, शहर सरचिटणीस, भाजप युवा मोर्चा, सोलापूर
    सोलापूर धर्मसभेला आम्ही सर्वतोपरी साहाय्य करू, तसेच आम्ही सर्व कार्यकर्त्यांसह सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहू, असे आश्‍वासन भाजप युवा मोच्यार्र्चे शहर सरचिटणीस श्री. बिज्जु (आण्णा) प्रधाने-लोणारी यांनी दिले. या वेळी त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांची भेट घेऊन त्यांना सभेचे निमंत्रण आणि अंक भेट दिला, त्या वेळी त्यांनी वरील आश्‍वासन दिले. या वेळी समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट आणि विनोद रसाळ उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.