BREAKING NEWS

Sunday, November 27, 2016

आजचे तथाकथित समाजसुधारक म्हणून मिरवणारे हेच खरे धर्मविध्वंसक ! - पू. संत (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते

श्रीक्षेत्र आळंदी (पुणे) येथे १२ वे वारकरी महाअधिवेशन


अधिवेशनाला उपस्थित संत, धर्माचार्य आणि मान्यवर
    












श्रीक्षेत्र आळंदी  - धर्माचे रक्षण करणे, हे सर्व वारकर्‍यांचे कर्तव्य आहे. सध्या हिंदु धर्मावर होत असलेले अन्याय सहन होत नाहीत; म्हणून या अधिवेशनाचे आयोजन केले आहे. संभाजी ब्रिगेड ही धर्मविध्वंसक आहे. त्यांनी संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले नसून त्यांचा खून केला गेला, असे समाजात खोटे पसरवले. त्याविषयी कोणी खंडण करत नाही, याचा अर्थ ते सर्वांना मान्य आहे, असा अर्थ निघतो.
ह.भ.प. आदिनाथ महाराज पोळ यांचा
सत्कार करतांना पू. ह.भ.प. वक्ते महाराज (उजवीकडे)
यामुळे संभाजी ब्रिगेडची शक्ती वाढली आणि आघाडी शासनाच्या कार्यकाळात त्याविषयीचे पुस्तक शासनमान्य करवून घेतले. दाभोलकर, पुरुषोत्तम खेडेकर, श्रीमंत कोकाटे यांसारखे अनेक तथाकथित समाजसुधारक म्हणून मिरवणारे असे लोक हेच खरे धर्मविध्वंसक आहेत. कुराणचे पालन करणे, ही अंधश्रद्धा आहे, हे सांगण्याची त्या समाजसुधारकांची हिंमत नाही. नोटांवर संस्कृत भाषेचा उपयोग केला; म्हणून अनेकांचा जळफळाट व्हायला हा देश ख्रिस्ती आहे का ? असे असेल, तर मग नोटांवर इंग्रजी भाषाही वापरली जाऊ नये, असे सडेतोड मार्गदर्शन पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते यांनी केले. राष्ट्रीय वारकरी सेना, वारकरी संप्रदाय आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येथे २६ नोव्हेंबर या दिवशी आयोजित महाअधिवेशनात ते बोलत होते. अधिवेशनाला ५५० हून अधिक वैष्णवजन आणि धर्माभिमानी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवर

महाअधिवेशनाला उपस्थित वारकरी
    महाराष्ट्र राज्य वारकरी मंडळाचे ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, श्री वारकरी प्रबोधन महासमिती ह.भ.प. रामेश्‍वर महाराज शास्त्री, द्वाराचार्य जगद्गुरु प.पू. अमृतदास जोशी महाराज, मुमुक्षु पाठशाळेचे ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने, वारकरी शिक्षण संस्थेचे ह.भ.प. रामचंद्र महाराज पेनोरे, राष्ट्रीय युवा कीर्तनकार हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड, ह.भ.प. किशोर महाराज शिवणीकर, ह.भ.प. बाळू महाराज पाटील, ह.भ.प. डॉ. नारायण महाराज जाधव, ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे, ह.भ.प. बाबूराव महाराज वाघ, राष्ट्रीय वारकरी सेनेचे युवाध्यक्ष ह.भ.प. शुभम महाराज वक्ते, राष्ट्रीय वारकरी सेनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, राष्ट्रीय वारकरी सेनेचे कोकण प्रांताध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर, निवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर चपळगावकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले, हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या कु. मोनिका गावडे, सनातन संस्थेचे श्री. चंद्रशेखर तांदळे आदी विविध संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते. 
   यावेळी   पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते यांनी उपस्थित सर्वांना सांगितले की, आपल्या घरी आणि नातेवाईक यांच्याकडे साप्ताहिक सनातन प्रभात चालू करावे; कारण धर्मद्रोही आणि धर्मांध यांच्या विरोधात लढण्याचे सामर्थ्य सनातन प्रभातमध्ये आहे. त्यामुळेच मीही माझ्या आप्तेष्टांना साप्ताहिक सनातन प्रभात टपालाने चालू केले आहे. 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.