BREAKING NEWS

Sunday, November 27, 2016

अंनिसमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडणार ! - आमदार श्री. लक्ष्मण जगताप

अंनिसवर कारवाई व्हावी यासाठी पुण्यातील भाजप आमदारांचा सकारात्मक प्रतिसाद


प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी (उजवीकडे) यांना
विषय समजावून सांगतांना श्री. प्रवीण नाईक
     पुणे - नागपूर येथे येत्या हिवाळी अधिवेशनात अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करून त्यांच्यावर बंदी आणावी, या मागणीसाठी मी लक्षवेधी सूचना मांडून प्रयत्न करेन, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड येथील भाजप आमदार श्री. लक्ष्मण जगताप यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी आणि अन्य कार्यकर्त्यांनी यांनी श्री. जगताप यांच्या कार्यालयात भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अंनिसमध्ये होत असलेला भ्रष्टाचार, साहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी सादर केलेला अहवाल यांविषयीची माहिती दिली.


अंनिसची चौकशी करण्यासाठी विधी आणि न्याय विभागाच्या मुख्य सचिवांशी चर्चा करणार ! 
- आमदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी 
     अंनिसकडून होत असलेले आर्थिक घोटाळ्याचे प्रकरण गंभीर असून त्यांची चौकशी व्हावी, यासाठी मी विधी आणि न्याय विभागाच्या मुख्य सचिवांशी चर्चा करून तसे प्रयत्न करेन, असे प्रतिपादन भाजप आमदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रवीण नाईक आणि अन्य कार्यकर्त्यांनी सौ. कुलकर्णी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. त्या वेळी त्या बोलत होत्या. 
     सनातन संस्थेच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढतांना त्या म्हणाल्या, माझा सनातन संस्थेला सदैव पाठिंबा असून माझी सनातनवर श्रद्धा आहे.
क्षणचित्र
     या वेळी प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी त्यांच्या स्वीय सचिवांना विधी आणि न्याय विभागाच्या मुख्य सचिवांची वेळ घेऊन ठेवण्यास सांगितले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.