अमरावती / सुरज देवहाते /-
तपोवन संस्थेनेही दिला डिजिटल इंडिया ला साथ-संस्थेच्या वेबसाईट चे लोकार्पण
![]() |
अमरावतीच्या महापौर रीनाताई नंदा आपले मनोगत व्यक्त करताना |
कुष्ठमहर्षी डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांची आज (२८ डिसेंबर) १२५ वी जयंतीउत्सव तपोवन येथे साजरा करण्यात आला. आज दिवसभरच तपोवन परीसरासाहित अमरावती शहरात प्रभातफेरी काढण्यात आली त्या माध्यामतून डॉ. शिवाजीराव पटवर्धन व तपोवन बद्दल समाजजागृती करण्यात आली तपोवन येथे ब्लड डोनेशन कॅम्प चे आयोजन आजचा तारखेत करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री डॉ अतुल आळशी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉ. शिवाजीराव पटवर्धन (दाजी) यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला
यावेळी इतक्या थंडीत एवढ्या मोठ्या संख्येत आलेल्या उपस्थितांच त्यांनी आभार मानले.
दाजी साहेबानी कुष्ठरोग झालेल्या कैद्यांचं पुनर्वसन केलं , दाजी साहेब नेहमी प्रसिद्धी पासून दूर राहायचे
त्यांनी अनेक उद्योगधंदे तपोवन इथे सुरु केले आहेत शासनाने हि बरीच मदत यात केली आहे दिवसेन दिवस कुष्ठरोग्यांची संख्या आता कमी होत आहे , दाजी साहेबांचा कार्याला आणखीन वाढवायता येईल किंवा समाजातील इतर काही समस्या तपोवन च्या माध्यमातून सोडवता येईल अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली.यावेळी महापौर रीनाताई नंदा यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले कि प्रत्येकांनी तपोवन मध्ये आपला वाढदिवस साजरा करावा.
त्यांनी अनेक उद्योगधंदे तपोवन इथे सुरु केले आहेत शासनाने हि बरीच मदत यात केली आहे दिवसेन दिवस कुष्ठरोग्यांची संख्या आता कमी होत आहे , दाजी साहेबांचा कार्याला आणखीन वाढवायता येईल किंवा समाजातील इतर काही समस्या तपोवन च्या माध्यमातून सोडवता येईल अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली.यावेळी महापौर रीनाताई नंदा यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले कि प्रत्येकांनी तपोवन मध्ये आपला वाढदिवस साजरा करावा.
आजच्या या जयंती उत्सवाला अमरावतीच्या प्रथम नागरिक तथा महापौर रीनाताई नंदा , तपोवन च्या विद्यमान नगर सेविका स्वाती निस्ताने, गोविंद भाऊ कासट, डॉ ठोंबरे , श्री विवेक मराठे , सुरेखाताई लुंगारे ,व सर्व जुने विध्यार्थी सहित तपोवन परिसरातील नागरिक उपस्थित होते
![]() |
ज्या वेळी वेबसाईट चे अध्यक्षांच्या हातून लोकार्पण झाले तो क्षण |
यावेळी जगाच्या कानाकोपऱ्यातून तपोवन ची माहिती सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी वेब साईट चे लोकार्पण करण्यात आले सदर वेबसाईट चे लाइव्ह प्रेजेन्टेशन तेथे दाखवण्यात आले. यावेळी लक्ष IT सोल्युशन चे व्यवस्थापक अमित सावरकर व सागर काळबांडे उपस्थित होते
कोण होते कुष्ठमहर्षी डॉ. शिवाजीराव पटवर्धन

हिंदुस्थानात ज्या काही समाजसेवकांनी कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी आपले जीवन अर्पण केले अशांमध्ये डॉ. शिवाजीराव ऊर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांचे नाव अग्रभागी आहे. डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांचा जन्म कर्नाटकातील जमखंडी या संस्थानात एका छोट्या गावी झाला. लहानपणीच आईवडिलांचे छत्र हरपल्यामुळे मोठी बहीण बहीणाक्का जोशी यांनी त्यांचे संगोपन केले. अतिशय हुशार व तल्लख बुद्धिमत्ता असलेल्या शिवाजीरावांचे प्राथमिक शिक्षण जमखंडी येथे व शालेय शिक्षण पुण्यात झाले.
१९१८ मध्ये अमरावतीत आलेल्या प्लेगच्या साथीत घरोघर फिरून त्यांनी रुग्णांवर मोफत औषधोपचार केले व आपल्या वैद्यकीय सेवेचा श्रीगणेशा केला. नंतर दारूबंदी आंदोलन, परदेशी कपड्यांवर बहिष्कार आदी आंदोलने करून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. गांधीजींच्या प्रत्येक आंदोलनात दाजीसाहेब व त्यांच्या पत्नी पार्वतीबाई नेहमीच आघाडीवर असत. यासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला. एकदा त्यांना एक कुष्ठरोगी रस्त्यावर बसून भीक मागत असलेला आढळून आला. अंगावर जखमा, हातापायांची बोटे झडलेली, विद्रुप चेहरा अशा अवतारात तो भीक मागत होता. हे दृश्य पाहून शिवाजीरावांचे हृदय हेलावून गेले व ते सारखा त्याच गोष्टीचा विचार करू लागले. पुढे लगेचच त्यांना असे कळले की त्या भिकार्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. विहिरीतून वास येऊ लागला, पण मृतदेह बाहेर काढण्यास कुणीही तयार नव्हते. लोकांनी मागणी करून ती विहीर नगरपालिकेला बुजवायला लावली. याचा शिवाजीरावांच्या मनावर खोल परिणाम होऊन त्यांनी उर्वरित आयुष्यात कुष्ठसेवा हेच आपले ध्येय ठरविले. त्यामुळेच त्यांनी गांधीजींच्या सरकारमध्ये सामील होण्याच्या प्रस्तावास नकार दिला. आता सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे कुष्ठधाम उभारण्यासाठी आवश्यक जागेचा. अमरावती शहराच्या आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्यास सुरुवात झाली. शहराच्या पूर्वेला ५ कि.मी.वर मोकळी व पडीक जमीन त्यांच्या नजरेस पडली. जुगल किशोर जयस्वाल हे या जमिनीचे मालक आहेत हे त्यांना कळले. शिवाजीरावांनी जयस्वाल यांच्या मुलाला एका दुर्धर आजारातून औषधोपचार करून वाचविले असल्यामुळे दानशूर जुगल किशोर यांनी आपली ८० एकर पडीक जमीन कुष्ठधामासाठी दिली. दाजीसाहेबांच्या जागेची नड लक्षात घेता प्रेमलवार व लाला शामलाल यांनीही आपली जमीन दाजीसाहेबांना देणगी म्हणून दिली. २६ सप्टेंबर १९४६ रोजी या घटस्थापनेच्या दिवशी ‘श्री जगदंबा कुष्ठनिवास, तपोवन’ या संस्थेची आचार्य विनोबा भावे यांच्या हस्ते स्थापना करण्यात आली. १ जुलै १९५० रोजी संस्थेचे रीतसर उद्घाटन होऊन ती ‘विदर्भ महारोगी सेवा मंडळ’ या नावाने पुढे नावारूपास आली.
Post a Comment