नांदगाव पेठ :/--- पदाचा दुरुपयोग करून चार ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतच्या सामान्य निधीतील व विविध योजनेतील लाखो रुपयांची आर्थिक घोटाळा केल्याचा प्रकार उघडकीस आला असून विस्तार अधिकारी जितेंद्र देशमुख यांनी नांदगाव पेठ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
१९९७ ते २0१0 या कालावधीत तत्कालीन ग्रामसेवकांनी हा घोटाळा केला आहे. ग्रामपंचायतच्या लेखा परिक्षणामध्ये हा प्रकार उजेडात आला असून प्रथमदर्शनी दोन लक्ष रूपयांचा घोटाळा पुढे आला आहे. नोव्हेंबर २0१५ ला सदर प्रकरणाचा अहवाल जितेंद्र देशमुख यांनी पिआरसी समोर सादर केला होता त्यावेळी १९९७ ते २0१0 या कालावधीत कर्तव्यावर असलेले दोषी ग्रामसेवक आर.डब्ल्यू लिखील, एस. पी. देशमुख, एच. एम.उताणे व एस. एस. सगणे यांना खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु, याबाबत कोणतीच प्रतिक्रिया न दिल्याने पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जितेंद्र देशमुख यांनी चारही ग्रामसेवकांविरोधात नांदगाव पेठ पोलिसात तक्रार दाखल केली.
१३ व्या वित्त आयोगातील कामे करून मुल्यांकन केले नाही. सामान्य निधी बांधकाम व विविध योजनेतील लाखो रूपये गडप करण्यात आल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी आर. डब्ल्यु. लिखील, एस. पी. देशमुख, एच. एम. उताणे व एस. एस. सगणे यांच्याविरोधात भादंवि ४0९ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Post a Comment