अमरावती/सुरज देवहाते /--
आयुक्तांच्या बदली वरून सर्वपक्षीयांकडून शहर बंदच्या आंदोलनाला वेगळेच वळण प्राप्त झाले आहे. शहरात केलेल्या तोडफोड प्रकरणी ३२ लोकांवर गुन्हे दाखल करून नगरसेवकांसह १७ लोकांना अटक केली.
मनपा आयुक्तांच्या बदली संदर्भात शहरात चर्चीला पेव फुटले असताना त्यांची बदली होऊ नये. यासाठी राजकीय पक्ष सामाजिक संघटना सरसावल्या तर सर्वपक्षीय नगरसेवक वतीने शुक्रवारी स्वाक्षरी अभियान घेऊन शनिवारला बंदचे आवाहन केले होते.
शनिवारला राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांनी बंद दरम्यान व्यापार्यांना जबरदस्तीने दुकाने बंद करण्यासाठी हुज्जतबाजी घातली, तर मराठासावजी हॉटेल, मोबाईल दुकाने आणि अन्य बंद दुकानाची तोडफोड करीत शहरात गोंधळ घातल्यामुळे तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. शिवाय पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. पोलिस उपायुक्त श्री नितीन पवार व अधिकारी श्री देशमुख यांनी वेळीच दक्षता घेत परिस्थिती नियंत्रणात आणली होती व स्वतः शहरात पायदळ पेट्रोलिंग करून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.झालेल्या तोडफोडीमुळे व्यापार्यांना आर्थिक नुकसान होऊन भितीचे वातवारण निर्माण झाले होते. सिटी कोतवाली पोलिसांनी बत्तीस लोकांवर भादंवि कलम १४७, १४८, १४९, ५0६, ४२९, १0९ आणि सार्वजनिक मालमत्ता चे नुकसान कलम ७ अन्वये गुन्हा दाखल केले असून चित्रीकरणावरून आसिफ हुसैन, रफू पत्रकार, श्री विक्की धारू, श्री राज सारवान, श्री विक्की चावरे, श्री योगेश चावरे, श्री अरुण जयस्वाल, श्री मुन्ना तिवारी यांना शनिवारच्या मध्यरात्री अटक केली तर श्री दिनेश बुब, श्री धीरज हिवसे, इम्रान अशरफी, हमीद शद्दा, श्री राहुल माटोळे, श्री विजय सिरसैया ,श्री प्रदीप बाजड, श्री अविनाश मार्डीकर, श्री बबलू शेखावत, यांनी रविवारी दुपारी स्वत:हून अटक करून घेतली. सर्वांना रविवारी जिल्हासत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

Post a Comment