जगप्रसिद्ध ‘रामायण’ या रामानंद सागर यांच्या गाजलेल्या मालिकेत वीभीषणाची भूमिका साकारणाऱया श्री मुकेश रावल यांचा मृतदेह कांदिवली रेल्वे ट्रकवर आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश हे काल मंगळवारी घरातून बाहेर पडले होते . मात्र, ते घरी लवकर न परतल्याने त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसात याबाबतची तक्रार दिली त्यावेळी पोलिसांनी फोटो दाखवून मुकेश यांच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती दिली. मुकेश यांच्या मुलीने त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवली आहे. मुकेश यांचा धक्कादायक मृत्यू झाला असून, त्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Post a Comment