ग्लोबल वॉर्मिंगचा वाढता धोका लक्षात घेता
पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज - श्री नितीन गवळी
चांदुर रेल्वे- (शहेजाद खान)-
वाढत्या प्रदूषणामुळे विविध जैव घटकांवर होणारे अनिष्ठ परिणाम लक्षात घेता पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने कर्तव्य भावनेतुन सहभागी होणे गरजेचे आहे. तरच ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या धोक्याला आपण रोखू शकतो. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा वाढता धोका लक्षात घेता पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन तिसऱ्या आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार नितीन गवळी यांनी केले. ते प्रभाग २ मधील प्रचार शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.
स्थानिक नगर परिषद निवडणूकीची तयारी पूर्ण झाली आहे. अर्ज मागे व चिन्ह वाटप होताच प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली. अशातच चांदुर रेल्वे नगर परिषदच्या अध्यक्षपदाच्या प्रचाराचा नारळ सर्वच पक्षांनी फोडुन प्रचाराला प्रारंभ केला. यानंतर तिसऱ्या आघाडीच्या प्रभाग क्र. २ मधील नगरसेवकपदाचे उमेदवार विनोद पंजाबराव लहाने व सौ. अरूणा मनोज शिंदे यांनी सर्वांपेक्षा आगळावेगळा प्रचार शुभारंभ केला. प्रचार शुभारंभ चक्क वृक्षारोपनाने करून समाजात वृक्षांविषयी एक संदेश दिला. हा शुभारंभ नगराध्यक्षपदाचे उमेदवार नितीन गवळी यांच्या हस्ते वृक्षारोपन करून करण्यात आला. यानंतर विनोद लहाने, सौ. अरूणा शिंदे व कार्यकर्त्यांनीही वृक्षारोपन केले. तसेच यावेळी पृथ्वीच्या भूगर्भातील पाण्याचा साठा कमी
होत चालला असल्यामुळे भविष्यात पाण्याची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. पाण्याचे पुर्नभरण करण्यासाठी वृक्षारोपणाचे महत्वही विषद केले.
यावेळी तिसऱ्या आघाडीचे सर्व नगरसेवकपदाचे उमेदवार, कार्यकर्ते तसेच प्रभाग २ मधील नागरीक प्रामुख्याने उपस्थित होते.
Post a Comment