BREAKING NEWS

Sunday, January 8, 2017

स्पर्धेत टिकून राहणे गरजेचे-डॉ.आसाराम लोमटे --- दैनिक श्रमिक एकजूटच्या दिनदर्शिकेचे लोकार्पण 

मोईन खान  / परभणी-/ 


 दिनदर्शिकेच्या भाऊगर्दीमध्येही स्पर्धेत टिकून राहण्याचे काम आज दैनिक श्रमिक एकजूटच्या दिनदर्शिकेच्या माध्यमातून दिसून आले. भिंतीवरती दिनदर्शिका असावे नसता ती भिंत रिकामी वाटते असे मत साहित्यीक डॉ.आसाराम लोमटे यांनी व्यक्त केले.

दैनिक श्रमिक एकजूटच्या दिनदर्शिका-२०१७ चा लोकार्पण सोहळा ७ जानेवारी रोजी कार्यालयात पार पडला. यावेळी कृषीभुषण तथा नाम फाऊंडेशनचे समन्वयक कांतराव देशमुख, ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी, साहित्यीक डॉ.आसाराम लोमटे, राहटी येथील विश्वशांती ज्ञानपीठाचे संस्थापक यज्ञकुमार करेवार, संजय ठकारे, दिपक तलरेजा, बी.आर.पाटील, मनोहर चौधरी, माहिती कार्यालयाचे प्रविण भानेगांवकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. बाजारामध्ये आज नवनवीन प्रकारच्या दिनदर्शिका दिसून येतात. आजचे युग हे स्पर्धेचे बनले असून यासोबत आपणही टिकून राहणे तेवढेच गरजेचे आहे. याच स्पर्धेमध्ये श्रमिक एकजूटची देखील दिनदर्शिका नववर्षात आपल्या हाती येत आहे. याबद्दल एकजूट परिवाराचे कौतूक करत डॉ.लोमटे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांचा जिल्हा प्रतिनिधी राजकुमार हट्टेकर यांनी सत्कार केला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार रमाकांत कुलकर्णी, प्रविण देशपांडे, प्रसाद आर्वीकर, विशाल माने, मोहसीन खान, गोपाळ चौथाईवाले, सुधाकर श्रीखंडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमास पत्रकार सुरज कदम, बालासाहेब काळे, डॉ.धनाजी चव्हाण, विजय कुलकर्णी, मोईन खान, भालेराव, जिल्हा माहिती कार्यालयाचे गिरी आदीं उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुनिल तुरुकमाने यांनी केले तर उपस्थितांचे आभार रमाकांत कुलकर्णी यांनी मानले.

दर्जेदार दिनदर्शिका-जोशी

दैनिक श्रमिक एकजूटची दिनदर्शिका उत्कृष्ट छपाईसह स्हपष्ट आणि ठळक अशी सुबक दिनदर्शिका आहे. अचूक मांडणी आणि त्यातील वर्षातील सर्व सण, उत्सव, महापुरुषांच्या जयंत्या व त्या-त्या ठिकाणी त्यांचे छायाचित्र टाकल्यामुळे अत्यंत दर्जेदार अशी दिनदर्शिका दैनिक एकजूटच्यावतीने लोकांच्या स्वाधीन केली आहे असे गौरवोद्गार दैनिक दिलासाचे संपादक विजय जोशी यांनी काढले.

सर्व निमंत्रीतांचे मोगर्‍याचे रोपटे देवून स्वागत

परभणीत दैनिक एकजूटच्या दिनदर्शिकेच्या लोकार्पण कार्यक्रमानिमीत्त आलेल्या सर्व मान्यवरांचे राजकुमार हट्टेकर व ईतर उपस्थित पत्रकारांनी मोगर्‍याचे रोपटे देऊन झाडे लावा झाडे जगवा...चा संदेश देत हार-तुर्‍यांवर खर्च न करता निसर्गाचा समतोल राखण्याबाबत हातभार लावला. या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.