-
पळसखेड सर्कल मधील भारतीय जनता पार्टीमधून प्रशांत जगनराव कांबळे, सुनीत धोडेस्वार, पंजाब राऊत, तुळशीराम धारकर, यांची दावेदारी आहे. मात्र भारतीय जनता पार्टी चांदुर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर, घुईखेड, पळसखेड याठिकाणी कधीच निवडून येऊ शकली नाही. गेल्या वर्ष 2012 च्या जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपा मधील बंडखोरीमुळे भाजपा आपल्या उमेदवारांना निवडणून आणण्यात असमर्थ ठरली होती. त्यामुळे आता तालुक्यातील तीनही सर्कल पैकी पळसखेड सर्कल मात्र आता भारतीय जनता पार्टीसाठी सकारात्मक दिसताना दिसून येत आहे.
राज्याच्या निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता असतांना मात्र अद्यापही भाजपा चे पळसखेड सर्कल मधील उमेदवार निश्चित होत नसल्याने भाजपाला पुन्हा पक्षातील अंतर्गत बंडखोरीला तर सामोरे जावे लागणार नाही ना ? अशी शक्यता वर्तविल्या जात आहे.
वर्ष 2012 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपा दोन गटात विखुरल्या गेल्याने याचा फायदा अप्रत्यक्ष काँग्रेस पक्षाला झाला होता. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजपा मध्ये अजूनही गटातटाचे राजकारण केल्या जाईल कि, एकमताने निर्णय घेऊन सत्तेचा फायदा घेत भाजपा पळसखेड सर्कल काबीज करेल हि तर येणारी वेळचं ठरवणार आहे.
युवा मतदारांची निर्णायक भूमिका-
पळसखेड सर्कल मध्ये मोठ्या प्रमाणात नवीन मतदार नोंदणी करण्यात आली आहे. ज्यात युवकांची मोठ्या प्रमाणात नोंद झालेली आहे. त्यामुळे निश्चितच या सर्कल मध्ये मतदान करतांना युवा मतदारच योग्य उमेदवाराची निवड करून मतदान करणार आहे.
Post a Comment