या हल्ल्यात अमोल गवळी व त्यांचे सहकारी अंकुश खाडे व सागर गावंडे हे ही गंभीर जखमी झाले. नितीन गवळी यांनी या घटनेची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली असता पोलीसांनी गुन्हेगारांना वाचविण्याकरीता नितीन गवळींनी दिलेल़्या तक्रारीला बगल देत बदलून दिले. खरचं पोलीस स्टेशनमध्ये सत्य चालत नाही हे त्या दिवशी सर्वसाधारण माणसांच्या लक्षात आले. वानखडे टोळीनेच सि.सि.एन. न्युजच्या ऑफीसचे नुकसान करावे, त्यांच्या दुकानात येवुन त्यांना मारहान करावी, गावात दहशतीचे वातावरण निर्माण करावे असे गंभीर गुन्हे करूनही पोलीस प्रशासनाने व काही राजकीय नेत्यांच्या पाठबळाने या टोळीवर थातुरमातुर गुन्हे दाखल पोलीस प्रशासनाने करावे ही गोष्ट पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्मान करणारी आहे. सराईतल्या गुन्हेगारावर व दंगेखोरांवर जो अैक्ट लावण्यात आला तोच अैक्ट श्री नितीन गवळी, श्री अमोल गवळी व त्यांच्या सहकाऱ्यांवर लावण्यात आला. या दोघा भावांची व सहकाऱ्यांची मागील पार्श्वभुमी जर पाहली तर यांवर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल नाही. मनमिळावू वृत्तीचे व गावात सगळ्यांसोबत सलोख्याचे संबंध ठेवणारे हे लोक आहेत. यांच्यावरही दंगेखोरांचा अैक्ट लावणे ही बाब निंदणीय असून कुठेतरी पोलीस प्रशासनाचे हात ओले झाले अशी चर्चा जनसामान्यांत होत आहे.
आशिष वानखडे हा अमरावती जिल्ह्यात विविध गुन्ह्यांत अडकला आहे. अमरावतीच्या पोलीस स्टेशनमध्ये यावर अपहरणाचे गुन्हे, कुऱ्हा पोलीस स्टेशनमध्येही यावर गुन्हे दाखल आहे. असे किती़तरी गुन्हे वानखडेवर आहे. सहकारी दिनेश राठोड हा होमगार्ड होता. परंतु काही वर्षापहिले हा दरोडेखोरीत आरोपी बनल्यामुळे याला होमगार्डमधुन काढण्यात आले. म्हणजेच ही वानखडे व राठोड टोळी कुठेतरी गुन्हेगारी प्रवृत्तीशी संबंध ठेवणारी आहे.व हीच टोळी शहरात ए.के. केबल नेटवर्कच्या नावाने लोकांच्या घरात पोहचत आहे. ही टोळी या केबलच्या धंद्याच्या माध्यमातुन शहरातील लोकांच्या घरापर्यंत पोहचत आहे. ही टोळी गुन्हेगार व दरोडेखोरही आहे. अशा टोळीने केबलच्या माध्यमातुन लोकांच्या घरात घुसने म्हणजे कुठेतरी शहरात मोठ्या गुन्हेगारीला जागा देण्यासारखे आहे. पैशांच्या जोरावर का होईना हे नेहमी अशा गुन्ह्यांना सामोरे जातात. म्हणजेच चांगल्या लोकांचे जिवन धोक्यातच म्हणावे लागेल. त्यात चांदुर रेल्वे शहरात असलेले पोलीस शिपाई, सहाय्यक ठाणेदार व नव्याने रूजु झालेले ठाणेदारासारखे अन्यायाला साथ देणारे पोलीस प्रशासन असले तर खरच चांगल्या माणसांनी कधीही पोलीस स्टेशन व कोर्टाची पायरी न चढणेच बरे असेच शेवटी म्हणावेसे वाटते.
Post a Comment