बेळगाव–
प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा श्रीराम सेनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांना ५ जानेवारी या दिवशी एका अज्ञात व्यक्तीने संपर्क करून त्यांना अर्वाच्च शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकीही दिली आहे. यासंबंधी श्री. मुतालिक यांनी ७ जानेवारी या दिवशी उद्यमबाग पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली असून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
१. प्रथम आवेदन स्वरूपात पोलिसांनी श्री. मुतालिक यांच्या तक्रारीचा स्वीकार केला होता. नंतर न्यायालयाची अनुमती घेऊन ७ जानेवारीला तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
२. पोलीस निरीक्षक निरंजन पाटील पुढील अन्वेषण करत आहेत. ५ जानेवारी या दिवशी श्री. मुतालिक यांच्या भ्रमणभाषवर आलेल्या संपर्काची माहिती मागवण्यात येत आहे.
३. संपूर्ण माहिती उपलब्ध झाल्यानंतर जिवे मारण्याची धमकी देणार्या गुन्हेगारांचा शोध घेण्यात येणार आहे.
४. धमकीचा दूरभाषा आला, त्या वेळी श्री. प्रमोद मुतालिक हे चन्नम्मानगर येथे होते. त्यामुळे उद्यमबाग पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
Post a Comment