अमरावती- (शहेजाद खान)-/
मागील 30 वर्ष पत्रकारिता क्षेत्रात असणारे श्री मोहन भाऊ राऊत - धामनगाव रेल्वे येथील लोकमत दैनिकाचे तालुका प्रतिनिधी आहेत . अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने संत नगरी शेगांव येथे राज्यस्तरीय अधिवेशनात नवरत्न दर्पण पुरस्कार खा.प्रतापराव जाधव यांच्या हस्ते देण्यात त्यांना आला. गत 25 वर्षा पासुन लोकमत मध्ये कार्यरत असतांना आजपर्यंत आदीवासीच्या विविध समस्या त्यांनी लोकमत मध्ये प्रकाशित करून न्याय मिळउन दिला आदीवासीना घरकुल मिळावे,दलालानी त्यांच्या बड़कावलेल्या शेतंजमिनी त्यांना परत मिडाव्या म्हणुन राज्यस्तरावर बातम्या प्रकाशित केल्या. * बाल मजुरी कायद्याची होणारी अवहेलना * राज्यातील नद्या प्रदुषनांच्या विड्ख्यात * सुतगिरण्यांची बिकट अवस्था *सातबारा महिला शेतकऱ्यांच्या नावाने व्हावा अश्या बातम्या सह " या चिमण्यानो परत फिरा रे " अशी व्रुधाश्रमातील बातमी प्रकाशित करून जन्मदात्याची वस्तुस्थिती मांडली मागील तीन वर्षा पासुन लोकमत सतत त्यांची स्टार रिपोर्टर म्हणुन निवड करीत आहेत. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे..
Post a Comment