चंद्रपुर-
जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम डी सिह यांनी नुकतीच सावली पंचायत समिती अंतर्गत हिरापुर ,मोखाळा, व्याहाड खुर्द या गावांना भेट देवुन, गावातील चालु असलेल्या सिंचन विहिर बांधकामाची पाहणी केली.
जिल्हात स्वच्छ भारत मिशन व सिचंन विहिरीच्या कामात गती निर्माण होण्यासाठी नुकतीच जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम डी सिह यांनी सावली पंचायत समितीला भेट देवुन, स्वच्छ भारत मिशन व सिंचन विहिर बांधकामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल भोसले, सिंचाई विभागाचे कार्यकारी अभियंता सहारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता रविन्द्र मोहिते यावेळी उपस्थित होते. मोहिते यांनी सावली पंचायत समिती सभागृहात ग्रामसेवक यांचा स्वच्छ भारत मिशन विषयक आढावा घेण्यात आला. या सभेत सावली तालुका हागणदारीमुक्त करण्याविषयीचे नियोजन करुन देण्यात आले. याशिवाय कामे वेळेत कशी पुर्ण करावी याविषयी उपाय योजना करण्यासंबधाने माहीती देण्यात आली. सावली तालुक्यातील हिरापुर व मोखाळा या गावांना मुख्य कार्यकारी अधिकारी एम डी सिह यांनी भेट देवुन गावक-यांमध्ये स्वच्छतेची जाणिव निर्माण व्हावी म्हणुन लाभार्थ्यांशी चर्चा करुन शौचालयाचे भुमिपुजन करण्यात आले.गावात बांधकाम पुर्ण झालेल्या शौचालयाची पाहणी करण्यात आली. व्याहाड खुर्द येथे भेट देवुन गावात चालु असलेल्या सिंचन विहिरीच्या कामाची पाहणी करुन सिंचन विहिरीच्या लाभार्थ्यांशी चर्चा करुन, सिह यांनी येणा-या अडचणी लाभार्थ्यांकडुन जाणुन घेतल्या. सिंचन विहिर बांधकामाचा निधी लाभार्थ्यांना वेळेत देण्याच्या सुचना संबंधीत यंत्रणेला सिह यांनी यावेळी दिल्या.
Wednesday, February 15, 2017
सिईओंनी केली सिंचन विहिर व शौचालय कामाची पाहणी
Posted by vidarbha on 6:00:00 PM in चंद्रपुर | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment