तालुक्यातील सर्व रुग्णांचा आधार असलेल्या स्थानिक ग्रामीण रुग्णालय येथील अत्यंत महत्वाच्या असलेल्या सर्व औषधी संपल्या असून गेल्या महिन्याभरपासून तुटपुंज्या औषधीवर रुग्णालयातील कर्मचारी काम भागवत असल्याचे दिसून येत आहे.
सद्या सर्दी, अंगदुखी, खोकला इत्यादी सर्वच आजाराचे रुग्ण वाढत आहे. दररोज जवळपास चारशेच्यावर रुग्ण संख्या ग्रामीण रुग्णालयात येत असून डॉक्टर तर आहे पण त्यांनी लिहून दिलेली प्रभावी औषधीच रुग्णालयात उपलब्ध नाही. जखम झाल्यानंतर सर्वात आधी लावण्यात येत असलेले टी.टी.चे इंजेक्शन ही रूग्णालयात उपलब्ध नाही. अनेक रुग्णांना भरती झाल्यानंतर त्यांना लावायला सलाइन पण येथील गेल्या आठ दिवसापासून संपल्या आहे. खोकल्याचे औषध तर वर्षभरापासून बेपत्ता आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, डॉक्टर आहेत नर्स आहेत पण त्यांनी तपासणी केल्यानंतर लिहून दिलेले औषध च नसल्यामुळे तालुक्यातील गरीब रुग्णांची कुचंबना होत आहे. स्थानिक रूग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा केली असता, आम्ही जिल्ह्यावर मागणी केली आहे. परंतु तिथेही औषधसाठा उपलब्ध नसल्यामुळे औषधीसाठी पाठविलेला कर्मचारी खाली हात परत येत आहे. रूग्णालयात सर्वात महत्वाचे औषध ही आता संपत आले असून आहे त्या तुटपुंज्या औषधीवर ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सुरु आहे. अनेक रुग्णांना नाइलाजाने बाहेरून औषध आणावे लागत आहे. गेल्या काही महिन्याअगोदर जिल्ह्यावरून प्रत्येक तालुका रुग्णालयाला 3 लाखांचे औषध मिळणार असल्याचे आश्वासन वरिष्ठ कार्यालयकडून मिळाले होते. परंतु अजूनही औषध मिळाले नसल्यामुळे तालुक्यातील गरीब रुग्णांना प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असुन तत्काळ औषधी पुरवठ्याची मागणी शहरात जोर धरत आहे.
Post a Comment