चांदुर रेल्वे - / शहेजाद खान -
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदार संघात दुहेरी तर कुठे तिहेरी लढती होत असून अनेक ठिकाणी बंडोबांनीही दंड थोपटल्याचे सोमवारी उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर स्पष्ट झाले. मात्र तालुक्यात स्वबळावर निवडणुक लढविणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला सर्वात महत्वाच्या घुईखेड सर्कलमध्ये चक्क उमेदवारच मिळाला नसल्याचे समजते.
तालुक्यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, जनता दल (सेक्युलर), बसपा, भारीप- बमसं, या पक्षांचे उमेदवार मैदानात असतानाच बसपा, भारीप- बमसं या पक्षांमध्ये झालेली स्थानिक युती आणि अपक्ष उमेदवारसुद्धा रिंगणात असल्याने यावेळची निवडणूक प्रथमच अत्यंत चुरशीची ठरत आहे. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांपैकी काहीजणांनी स्वेच्छेने तर अनेकांनी नाराजीतूनच माघार घेतल्याचे अखेरच्या दिवशी स्पष्ट झाले. अनेक ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांनीही पक्षासाठी तर काही जणांना दबाव आणि आमिषापोटी माघार
घ्यावी लागली. तर काही जणांनी पक्षनिष्ठा, दबाव व आमिषालाही दाद न देता थेट बंडखोरीचे रणशिंग फुंकले. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीने लढली जाणार आहे. माघारीची मुदत संपली आणि आपल्याविरोधात कोण आहे, याची
जाणीवही झाली. त्यामुळे सोमवारी सायंकाळपासूनच तालुक्याच्या ग्रामीण
भागात प्रचाराचे धूमशान सुरू झाले. रविवारी
(दि.19) सायंकाळपर्यंत गावागावात आणि
गल्लीत प्रचाराचा धुरळा उडणार आहे. 21 फेब्रुवारीला मतदान आहे. या जिल्हा परीषद निवडणुकीत यंदा शिवसेना स्वबळावर लढत असुन घुईखेड, पळसखेड, आमला या तीनही सर्कलमध्ये आपले उमेदवार उभे केले आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसही स्वबळावर लढत असतांना त्यांना घुईखेड सर्कलमध्ये उमेदवारच मिळाला नसल्याचे समजते. एकीकडे भाजप, कॉंग्रेसकडे उमेदवारीसाठी काही दिवसांपुर्वी रांग लागली असतांना महाराष्ट्रात प्रभाव असणारा राष्ट्रीय पक्ष राष्ट्रवादीला मात्र घुईखेड सर्कल मधुन कोणीही इच्छुक मिळाला नाही. त्यामुळे घुईखेड सर्कलमधुन १० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अॅनालॉग) घड्याळ हे राष्ट्रवादीचे चिन्हच गायब झाले आहे. स्थानिक नगरपरीषद निवडणुकीत कॉंग्रेसने राष्ट्रवादीसोबत युती न करता स्वबळावर निवडणुक लढविली होती. कॉंग्रेसने स्वबळावर लढतांना नगराध्यक्षासह तब्बल १० नगरसेवक निवडुन आले. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वबळावर निवडणुक लढविल्यानंतर एकही नगरसेवक निवडुन आलेला नाही. त्यामुळे कॉंग्रेसने नगरपरीषद निवडणुकीत युती न करता राष्ट्रवादीला आपली जागा दाखवुन दिली. अशीच पुनरावृत्ती राष्ट्रवादीची जिल्हा परीषद निवडणुकीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण याही निवडणुकीत राष्ट्रवादीचा फारसा प्रभाव दिसत नाही आहे. शहरात राष्ट्रवादीचे केवळ नेते असुन त्यांना पक्षात कार्यकर्ते जोडता आलेले नाही. पांढरे शर्ट घालुन फिरणारे नेते पक्ष मजबुतीसाठी कोणत्याही प्रकारचे काम करीत नसुन याचाच फटका राष्ट्रवादीला बसत आहे. जिल्ह्याच्या मोठ्या पदांवर शहरातील राष्ट्रवादीचे काही नेते विराजमान असुन तालुक्यात मात्र पक्षाची वाट लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
Wednesday, February 15, 2017
घुईखेड सर्कमधुन राष्ट्रवादीचे घड्याळ गायब - आमला, पळसखेड सर्कलमध्येही कमी प्रतिसाद जि.प. निवडणुक दंगल
Posted by vidarbha on 5:26:00 PM in चांदुर रेल्वे - / शहेजाद खान - | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment