रेल्वे प्रशासनाच्या कारवाईचा त्रासाला कंटाळून वर्धा येथे रेल्वे प्रवाशांनी आज मुंबई वरून नागपूर जाणारी विदर्भ एक्सप्रेस रोखून धरली. महिन्याचा पासधारकांनवर होत असलेल्या कारवाईचा निषेध करीत प्रवाशांना बसण्याची सोय करण्याची मागणीचा येथे उद्रेक बघावयास मिळाला. आज जेव्हा विदर्भ एक्स स्थानकावर आली त्यावेळेस सामान्य डब्यात पाय ठेवायलाहि जागा न्हवती त्यामुळे प्रवाश्यांनी रेल रोकून धरली
गेल्या महिनाभरापासून रेल्वेचे कर्मचारी हे मासिकपास धारकांविरुद्ध आरक्षित डब्यात बसल्यावरून दंडाची कारवाई करीत होते. ही कारवाई करीत असताना अनेकदा रेल्वे कर्मचारी हे प्रवाशांना अपमानास्पद वागणून देत असल्याच्या तक्रारीत सातत्याने वाढ होत होती. वृत्त लिहीपर्यंत सुमारे 50 मिनिटे गाडी वर्धा येथे थांबून होती.
Post a Comment