मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) –
जनतेत जाऊन सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून काम केल्यानंतर भारतासारख्या जात वर्गीय समाजात समताधिष्ठित समाज निर्माण होण्यासाठी प्रबोधानाची क्रांती होणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'अनहिलेशन ऑफ़ कास्ट' या पुस्तकाच्या आधारावर देशात जातीअंतक सांस्कृतिक क्रांती झाली पाहिजे. ही क्रांती करण्याचे काम "नवयान" विद्रोही जलसा द्वारे केले जाईल अशी माहिती विद्रोही शाहिर शितल साठे यांनी दिली.
मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये विद्रोही शाहिर कलावंत शितल साठे, सचिन माळी यांची "नवयान" कलापथकाची स्थापना करण्यात आल्याची घोषणा मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित एका कार्यक्रमात करण्यात आली. यावेळी आमदार कपिल पाटिल, शाहिर संभाजी भगत, आनंद पटवर्धन, डॉ. बाबुराव गुरव, दिग्दर्शक संतोष संखद इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना सांस्कृतिक क्रांतीची वाटचाल बुद्धाच्या वाटेनेच करावी लागेल अशी आमची धारणा आहे. त्यामुलेच आम्ही आमच्या विद्रोही महाजलशाचे नाव 'नवयान' असे ठेवले आहे. 'नवयान' जाती, आर्थिक आणि लैंगिक विषमते विरोधात जातीअंतक सांस्कृतिक क्रांतीचा नारा देवून प्रबोधनाची चळवळ चालविणार आहे. राजकीय लोकशाही बरोबर सामाजिक लोकशाही व आर्थिक लोकशाही स्थापित होण्यासाठी नवयानच्या मध्यमातून आमची कला, कविता, लेखणी, आवाज, शाहिरी समर्पित करणार आहोत असे सचिन माळी यांनी सांगितले. तर फ्यासीवादाचे नवे संकट उभे आहे या संकटाचा मुकाबला करण्यासाठी नवयानच्या जलस्यामधून कार्यकर्त्याना बळ मिळेल असा विश्वास आमदार कपिल पाटिल यांनी व्यक्त केला.
Wednesday, March 29, 2017
जातीअंतक सांस्कृतिक क्रांती करण्याचे काम "नवयान" द्वारे केले जाईल – क्रांती शाहीर शितल साठे
Posted by vidarbha on 6:32:00 AM in मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment