जिल्हा प्रतिनिधि / महेंद्र महाजन जैन -
वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक 29 लाख 70 हजार रूपये एवढा मोठ्या रक्कमेचा विजबिलाचा भरणा करणा-या मालेगांव नगरपंचायतचे मुख्याधिकारी श्री गणेश पांडे यांच्या महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी उपविभाग मालेगांव च्या वतीने सत्कार करण्यात आला. व विद्युत बिलाची रक्कम एक रक्कमी भरुन विद्युत वितरण कंम्पनीला सहकार्य केल्या बद्दल नगरपंचायतचे आभार मानले आहे मालेगांव नगरपंचायत कडे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी विद्युत बिलाची रक्कम बाकी असतांना मालेगांव नगरपंचायतने पाणी पुरवठा योजना तसेच शहरातील स्ट्रीट लाइट विद्युत बिलाचा भरणा विद्युत विभागाकडे केला आहे त्यामध्ये 7 लक्ष रूपये व 23 मार्चला 22 लक्ष 70 हजार रूपये असे एकुन 29 लक्ष 70 हजार रूपये विद्युत बिलाचा भरणा नगर पंचायतने केला आहे एवठ्या मोठ्या प्रमाणात रक्कम भरणारी जिल्हातील एकमेव नगरपंचायत असावी. उपकार्यकारी अभियंता राजेश चव्हाण यांनी माहीती देतांना अधीक्षक अभियंता बनसोड साहेब कार्यकारी अभियंता मेश्राम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व पाठपुराव्यात विद्युत वितरण कंपनीची विज बील वसूली सुरू असतांना एवढा मोठ्या रक्कमेचा भरणाकरून नगरपंचायत मालेगांव ने सहकार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Saturday, March 25, 2017
सर्वाधिक रक्कमेच्या विद्युत बिलाचा भरणा करणारे मुख्याधिकारी पांडे यांचा सत्कार
Posted by vidarbha on 9:46:00 PM in जिल्हा प्रतिनिधि / महेंद्र महाजन जैन - | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment