निकाल उशीर लागत असल्याने विद्यार्थ्यांचा रोष
बादल डकरे /--
हिवाळी परीक्षा संपून तीन महिन्यांच्या कालावधी संपत आला असून अजून पर्यन्त विधी विभागाचा निकाल न लागल्याने आज डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय येथील विद्यार्थी यांनी अमरावती विद्यापीठावर धडक मोर्चा काढला होता.
निकाल उशिरा लागत असल्यामुळे विद्यार्थी याना नेमका कोणता विषयाचा अभ्यास करावा हे कळत नाही आहे त्यामुळे विद्यार्थी वर्गावर मानसिक त्रास हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याच प्रमाणे विधी विभागाचे ऑनलाइन अर्ज भरताना हि मोठ्या प्रमाणात संकेतस्थळ व्यस्त मुळे विद्यार्थी परीक्षा फोर्म भरायला मुकत आहे.
या सर्वबाबद्दल अमरावती विद्यापीठ कुलगुरू याना जाब विचारण्यासाठी 11 वाजता मोर्चा नेण्यात आला या मोर्च्या चे नेतृव मांगल्य निर्मल,श्री सोपान कनेरकर यांनी केले तसेच या मोर्च्या मध्ये प्रफुल्ल कांगले, संतोष शिंगाडे,स्वाती माने,बादल डकरे,अशोक विश्वकर्मा ,कारण महल्ले आनंद शिंदे,आरती पोकळे,रुचा देशपांडे, पूजा भागवत ,पूनम लुधियाना,अंकित तावरी,अंकुश घायर , विक्रम जाधव,रोनाक चांडक,अंकुश गावांडे,सुमित घाटेकर,आरती माडवगले,अखिलेश देशपांडे ,राहुल कळसकर आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.कुलसचिव यांनी बुधवार सायंकाळ पर्यन्त निकाल प्रसिद्द करण्याचे आश्वासन विद्यार्थी याना दिले .
Post a Comment