BREAKING NEWS

Monday, March 20, 2017

चांदुर रेल्वे न.प.च्या मुख्याधिकारीपदी श्री रविंद्र पाटील रूजु - भाजपाच्या वतीने करण्यात आले स्वागत

चांदुर रेल्वे - (शहेजाद खान ) -



स्थानिक नगर परीषदच्या मुख्याधिकारीपदी अखेर पुणे येथुन आलेले रविंद्र पाटील रूजु झाले आहे. कारभार सांभाळताच स्थानिक भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
         अनेक महिन्यांपासुन स्थानिक नगर परीषद चा मुख्याधिकारीपदाचा प्रभार चिखलदऱ्याचे मुख़्याधिकारी सुमेध अलोणे यांच्याकडे होता. त्यामुळे आता नगर परीषदमध्ये मुख्याधिकारीपदी पुणे येथील कमीश्नर कार्यालयात कार्यरत असलेले रविंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी स्थानिक नगर परीषदमध्ये कारभार सांभाळताच भाजपाचे नगरसेवक तथा गटनेता  संजय मोटवानी, नगरसेवक संजय पूरसाम, नगरसेविका सौ. निलीमा शर्मा, सौ. सूरेखा तांडेकर,सौ. दीपाली मिसाळ,नगरसेवक अजय हजारे तसेच मून्ना शर्मा, विजय मिसाळ, विलास तांडेकर आदींनी पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. स्थानिक नगर परीषदमध्ये झालेल्या घरकुल घोटाळ्याची चौकशी अजुनही प्रलंबितच आहे. त्यामुळे नवीन रूजु झालेले मुख्याधिकारी या प्रकरणातील दोषींवर चौकशी करून कारवाई करणार का याकडे सुध्दा अनेकांचे लक्ष लागले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.