सोमनाथ किसन होले , डॉक्टर मधुकर चंद्रकांत कोलते (वय ४५ वर्षे रा.फलटण, जि.सातारा), मदतनीस हेमंत बबन आटोळे ( ३५ ), ड्रायव्हर संतोष बबन ओतारी ( वय ४२ वर्षे रा. कसबा पेठ, ता. फलटण, जि.सातारा ) अशी अटक करण्यात अालेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्यासह गर्भलिंग निदान करणाऱ्या ३ महिलांना अटक करण्यात आली आहे.
सोमनाथ किसन होले यांच्या घरी डॉक्टर मधुकर चंद्रकांत कोलते हे काही महिलांची गर्भलिंग निदान चाचणी करणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकून त्यांना रंगेहात पकडले.
या छाप्यात सोनोग्राफी मशीन , एक रँक, ८ मोबाईल, गर्भपात करण्याचे औषध, मारुती सुझुकी कंपनीची सियाझ गाडी, रोख रक्कम ५९ हजार २६० रुपये असा एकूण १३ लाख ३० हजार ८०० रुपये जप्त करण्यात आले आहेत.
याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विलास नाळे करीत आहेत.
Post a Comment