दिव्यांगांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात भाजयुमो ने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाने सर्व समस्या निकाली काढण्याच्या ठोस आश्वासनानंतर दिव्यांगांचे धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. रिसोड तालुक्यात दिव्यांगांच्या समस्या फार जास्त प्रमाणात प्रलंबित असल्याने त्या सोडविण्यासाठी भाजयुमो च्या वतीने रिसोड पंचायत समिती मध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.शासनाच्या १९९५ च्या निर्णयानुसार दिव्यांगांना प्रत्येक ग्रामपंचायत, नगर परिषद व पंचायत समिती स्तरावर ३%निधी खर्च करणे बंधनकारक असतांना त्याची अजूनपर्यंत कोणत्याही प्रशासनाने रिसोड तालुक्यात अंमलबजावणी केली नाही तसेच इतरही प्रलंबित मागण्यां अजून पर्यंत जैसे थे आहेत त्या निकाली काढण्यासाठी रिसोड पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना दिव्यांग बांधवांनी घेराव घालून निवेदन दिले त्यानंतर दिव्यांगांंच्या मागण्या त्वरित निकाली काढण्याचे आश्वासन देत संबंधितांना तसे आदेश काढले तसेच दिव्यांगांसाठी ज्या ग्रामपंचायतीद्वारे ३% निधी खर्च केल्या जाणार नाही व घरकुल आणि सिंचन विहिरी देण्यासंबंधी योग्य प्रशासकीय सोपस्कार पार न पाडणाऱ्या ग्रामसेवकांवर कायदेशीर कारवाई करून त्याची सेवा पुस्तिकेत नोंद करणार असल्याचे सांगितले.तहसीलदार अमोल कुंभार यांनी ही दिव्यांगांच्या समस्या निकाली काढण्याचे आश्वासीत केले.अशाच मागण्यांचे निवेदन रिसोड नगर परिषदेलाही दिले असून दिव्यांगांचे मुख्याधिऱ्यांनी मागण्यांवर लवकर निर्णय घेऊन त्या सोडवू असे सांगितल्यावर आंदोलन स्थगित केले.आजच्या आंदोलनामध्ये तालुक्यातील शेकडो दिव्यांगांनी सहभाग घेतला होता.दिव्यांगांच्या धरणे आंदोलनासाठी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांनी पुढाकार घेतला होता.यावेळी माजी सभापती छायाताई सुनील पाटील,जेष्ठ कार्यकर्ते विष्णू खाडे,भाजयुमोचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख किशोर गोमाशे,जिल्हा कोषाध्यक्ष डॉ.प्रल्हाद कोकाटे,भाजपाचे तालुका उपाध्यक्ष गजानन कोकाटे,तालुका सरचिटणीस संतोष मवाळ,विष्णुपंत बोडखे,अमोल लोथे,पं स सदस्य श्रीकांत कोरडे,गोपाल जाधव,एसपी पल्लोड,संतोष बोडखे,नारायण जमधाडे,केशव डोंगरे,यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती
Saturday, March 11, 2017
दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी भाजयुमो ने प्रशासनाला धरले धारेवर,प्रशासनाच्या ठोस आश्वासनानंतर आंदोलन मागे
Posted by vidarbha on 8:30:00 AM in रिसोड -- महेंद्र महाजन | Comments : 0
रिसोड -- महेंद्र महाजन

Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment