महेन्द्र महाजन / वाशिम-
-वन विभागाच्या ‘महाराष्ट्र हरित सेना’ या योजनेमध्ये जिल्ह्यातील लोकांनी सदस्य म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी केले आहे. हरित सेनेत सहभागी होण्यासाठी www.greenarmy.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. याद्वारे नोंदणी केल्यानंतर संबंधितांचे प्रमाणपत्रही तयार होईल. विद्यार्थी, शासकीय अधिकारी-कर्मचारी,तसेच खासगी संस्थांचे कर्मचारी,अधिकारी, व्यावसायीक, ज्येष्ठ नागरिक यांना नोंदणी करता येईल.
जागतिक तापमानातील वाढ आणि ऋतू बदल या पार्श्वभूमीवर आणि राज्यांतील वनक्षेत्र २० टक्क्यांवरुन ३३ टक्केपर्यंत नेण्याचा भाग म्हणून,वृक्षारोपणाची गती तुटू न देता, त्यामध्ये सातत्य ठेवावे, असा निर्णय शासनाने घेतला आहे. पुढील तीन वर्षात नियोजित ५० कोटी वृक्षारोपणाचा व संगोपनाचा कार्यक्रम लोकसहभागाद्वारे जन चळवळीत रुपांतरीत करुन यशस्वीरीत्या राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभागी होणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘महाराष्ट्र हरित सेना’ स्थापन करण्यागचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र हरित सेनेचे सदस्य म्हणून नोंदणी करण्यासाठी www.greenarmy.mahaforest.gov.in या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. या संकेतस्थळावर दिनांक ३१ मार्च २०१७ वाशिम जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवक म्हणून व या उपक्रमाचे सदस्य म्हणून नोंदणी करावी.
ग्रीन आर्मीचे सदस्य असलेल्यास सभासदांना वृक्ष लागवड, संगोपन, वन व वन्याजीव आणि वन विभागातील संबंधित क्षेत्रामध्ये आपले योगदान देता येईल. तसेच या उपक्रमात उत्तम काम करणाऱ्या सभासदांना बक्षिस योजना व इतर सवलतीद्वारे सन्मानित करण्याची योजना शासनाच्या विचाराधीन आहे. नोंदणीची पद्धत अत्यंत सोपी असून वर नमूद संकेतस्थळावर आवश्यक ती माहिती भरल्यानंतर सभासद नोंदणी झाल्याचे प्रमाणपत्र सिस्टिममध्ये तयार होऊन सदस्याच्या मेल आयडीवर आणि एसएमएस वर पाठविले जाईल.जिल्ह्यातील विविध विभागांचे कर्मचारी, अधिकारी, त्यांचे कुटुंबिय, आप्तेष्ट, मित्र परिवार, सामाजिक, शैक्षणिक आणि इतर क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय आणि खाजगी संस्थां यांनी महाराष्ट्र हरित सेनेमध्ये सदस्य नोंदणी केल्यास त्यांना अशा उपक्रमात काम करण्याची संधी मिळेल, असे उपजिल्हाधिकारी श्री. कोरडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे
Saturday, March 11, 2017
जास्तीत जास्त नागरिकांनी ‘महाराष्ट्र हरित सेना’मध्ये सहभागी व्हावे - रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे
Posted by vidarbha on 8:35:00 AM in महेन्द्र महाजन / वाशिम | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment