
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या किन्हीराजा येथे आज सकाळीच 6 वाजता गुडमॉर्निंग पथक धडकल्याने उघड्यावर शौचास जाणार्याची चांगलीच धावपळ झाली. गुड मॉरिंग पथकाने टमरेल जप्त करत होळी केली
ग्रामस्थांनी गुडमॉर्निंग पथकाची धडकी भरली असुन आज पासुनच ग्रामस्थांनी शौचालय बांधकामकरण्यासाठी पुढाकारही घेतलेला आहे. आपले गांव लवकरात लवकर सुंदर व हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
यामध्ये मालेगांव तालुका समन्वयक पुष्पलता अफुने , स्वप्निल काळे प्रविण पान्हेकर, विजय नागे ,सदानंद राऊत, घूगे, लेखापाल विनायकसर, ग्राम विकास अधिकारी भुरकाडे अंगणवाडी सेविका,आशा मदतनीस पोलीस चौकी चे जमादार संतोष कव्हर ज्ञानेश्वर राठोड गावातील नागरिक सहभागी होते.
Post a Comment