

महाराष्ट्र बँकेच्या खातेदारांना जनधन खात्यांतून कर्ज देण्याचे आमिष दाखवून यूपीआय अँपच्या मदतीने भामट्यांनी लुटले आहे. हा प्रकार बँक ऑफ महाराष्ट्रच्या अॅपवर झाला आहे. त्यामुळे या अॅपप्रकरणी पोलिस बँकेतील अधिकार्यांची चौकशी केली आहे.
अॅपच्या त्रुटी व बँकेची तांत्रिक सुरक्षाही तपासण्यात आली असल्याचे कळते.१३ जणांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. शहर पोलिसांच्या विशेष पथकाने बँकेच्या दोन शाखांतील अधिकार्यांची चौकशी केली. औरंगाबाद व जालना विभागातील ४१ शाखांमध्ये १२०० पेक्षा अधिक संशयास्पद व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. खात्यात हजार व दोन हजाराची रक्कम असतानाही व्यवहार मात्र लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
पोलिस यातील सूत्रधाराचा शोध घेत आहे. याबाबत पोलिस आयुक्तालयात बँकेचे अधिकारी व पोलिस अधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत शाखानिहाय गुन्हा दाखल करण्यापेक्षा बँकेने नेमका गुन्हा कोणी दाखल करायचा आणि आरोपींचे धागेदोरे शोधून त्यांच्यावर कारवाई कशी करायची, या संदर्भात बँकेचे अधिकारी, पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची आयुक्तालयात अडीच तास बैठक झाली.
त्यानंतर शाखानिहाय गुन्हा दाखल करण्यापेक्षा बँकेने सविस्तर माहिती देणारा अर्ज दिल्यानंतर गुन्हा दाखल होईल, असे आयुक्तांनी सांगितले. बँक अधिकार्यांनी एका वकिलामार्फत तक्रार दिली.
Post a Comment