चांदुर रेल्वे - शहेजाद खान -
महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी अशी मागणी स्थानिक शिवसेनेतर्फे तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे.
सद्यस्थितीत महाराष्ट्रातील सर्व शेतकरी कर्जबाजारी असुन त्यांच्या शेतमालाला बाजारभाव नाही. त्यामुळे आजरोजी सर्व शेतकरी कर्ज भरू शकत नाही. त्यामुळे संपुर्ण उतारे कोरे करण्यात यावे व त्यामध्ये कोणतीही अट असु नये. शेतकरी आजपर्यंत कर्ज भरतांनी दोन - दोन दिवसासाठी महिन्याचे व्याज भरून सावकाराकडून घेऊन पैसे भरतात त्यामुळे ते कायमच कर्जबाजारीच आहे. तसेच मध्यम मुदत व दिर्घ मुदत कर्ज भरणेही सुद्धा शक्य नाही. शेतकऱ्यांना चालु कर्जासहित कर्जमाफी मिळावी अन्यथा थोड्याच दिवसात शेतकऱ्यांचा आत्महत्येचा वेग दुप्पट होईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहिल. त्यामुळे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी मिळावी अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख राजेश निंबर्ते, माजी तालुकाप्रमुख त्रिलोकचंद मानकानी, बंडु आंबटकर, मोरेश्वर राजुरकर, प्रकाश जयसिंगपुरे, आसीफ पठान, स्वप्नील मानकर, संदिप जरे, अरूण कावलकर, किशोर यादव, राम भोसले, देवदत्त देवळे, रवी वांढरे, सुभाष पेरसपुरे, विशाल देशमुख, अविनाश मेश्राम, अमोल जगताप आदींनी तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवदनातुन केली आहे.
Post a Comment