BREAKING NEWS

Friday, March 3, 2017

शासकिय तूर खरेदी सुरू करण्यासाठी उपसभापती अशोक चौधरी यांचे आमरण उपोषण -चांदूर रेल्वे तहसील कार्यालय समोर उपोषण सुरू


चांदूर रेल्वे / शहेजाद खान /--


नापेâडने चांदूर रेल्वेत शासकिय तूर खरेदी केंद्र  सुरू केले होते. मात्र २० फेब्रुवारीला वखार महामंडळाच्या गोदामामध्ये जागा शिल्लक नसल्याने अचानक तूर खरेदी बंद केली. त्यामूळे स्थानिक बाजार समिती आवारात शेतकऱ्यांचे  ३ हजार क्विंटल तूर पडून आहे. याशिवाय शेतकऱ्यानकडून तूर विक्रीसाठी वारंवार विचारणा होत आहे. हवामान खात्याने या आठवड्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली. त्यामूळे नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये यासाठी शासनाने त्वरीत निर्णय घेऊन शासकिय तूर खरेदी केंद्र  सुरू करावे यासाठी चांदूर कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अशोक चौधरी यांनी स्थानिक तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणला बसले आहे.
साठविण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने नापेâडने शासकिय तूर खरेदी थांबविली. याबाबत बाजार समितीने स्थानिक स्तरावर तोडगा काढण्यासाठी चांदूर रेल्वे वखार महामंडळ व विदर्भ मार्केटिंग  फेडरेशन यांच्याशीसुध्दा पत्रव्यवहार करून उद्भवणाऱ्या परिस्थीतीबद्दल अवगत केले. यावर तोडगा काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी तातडीची बैठक बोलावून पर्यायी व्यवस्था व खाजगी गोदाम भाड्याने घेण्याबाबत सुचना दिल्या.त्या अनुशंगाने बाजार समितीने आपल्या कार्यक्षेत्रातील गोदाम वखार महामंडळ अधिकाऱ्यांना दाखविले. परंतु शास्त्र्शोध  पध्दतीचे नसल्याने व नाफेडने  खरेदी केलेल्या तूरीसाठी योग्य नसल्याचे कारण देत नाकारले. त्यामूळे बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्याची तूर खरेदी पुर्णता थांबली असून व खाजगी बाजारातील तूरीचे दर ३५०० ते ४००० रूपये पर्यंत घसरलेले असल्यामूळे शेतकऱ्याना आपली तूर नाईलाजास्तव विक्री करावी लागत आहे. हवामान खात्याने या आठवड्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली.त्यामूळे शेतकऱ्याच्या बाजार समितीच्या आवारात असलेल्या शेतमालाची जबाबदारी बाजार समिती प्रशासनाकडून घेणे शक्य नाही. शेतकऱ्याच्या शेतमालाच्या नुकसान झाल्यास सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनकडे राहील. शेतकऱ्याचे हिताच्या रक्षणासाठी शासकिय तूर खरेदी केंद्र  सुरू करा अशी मागणी उपसभापती अशोक चौधरी यांनी लावून धरली आहे. यावेळी उपोषण मंडपात जि.प.सदस्य प्रविण घुईखेडकर, संतोष कदम, मांडवा उपसरपंच इंद्रपाल बनसोड, नरेश स्थुल, लखन सुखदेवे, श्री अग्रवाल, माजी पं.स.सदस्य राजेंद्र शेळके, सरपंच पंकज जगताप, बेलसरे, बाबर, शेंडे यासह तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.