कृउबास उपसभापती अशोक चौधरी यांचे उपोषण यशस्वी
चांदूर रेल्वे / शहेजाद खान --
चांदूर रेल्वे येथे नाफेडने तूर ठेवण्यासाठी गोदाम नसल्याचे कारण देत २०फेब्रुवारी पासून शासकिय
तूर खरेदी बंद केली होती. चांदूर रेल्वे कृउबासचे उपसभापती अशोक चौधरी यांनी शासकिय तूर खरेदी
सुरू करण्यासाठी शुक्रवार पासून आमरण उपोषणाला बसले होते. तर तूर खरेदी केंद्र तात्काळ सुरू
करण्यासाठी आ.प्रा.वीरेंद्र जगताप यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याशी यशस्वी शिष्टाई केल्याने
शनिवारी चांदूर रेल्वेत नाफेडने तूर खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले.
जिल्हाधिकारी यांनी तळेगाव दशासर व पोहरा येथील खाजगी गोदाम अधिग्रहीत करून नाफेडला त्वरीत
शासकिय तूर खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले. आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारीयाच्या
आदेशान्वये नाफेडने स्थानिक बाजार समितीच्या आवारात तूर खरेदीला सुरूवात केली. यावेळी एसडीओ
ललीत वऱ्हाडे, तहसीलदार राजगडकर, सहाय्यक निबंधक पारीसे, बाजार समितीचे सचिव इंगळे
उपस्थित होते. तूर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे पुष्पगूच्छे देऊन स्वागत केले. तर उपोषण मंडपात आमदार
श्री वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते रस प्राशन करून उपसभापती अशोक चौधरी यांनी उपोषण सोडले. यावेळी
उपविभागीय अधिकारी ललीत वऱ्हाडे , तहसीलदार राजगडकर, सहा.निबंधक पारीसे, कृउबासचे
संचालक अतुल चांडक, नगराध्यक्ष शिट्टू सुर्यवंशी, रंगराव चौधरी यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित
होते.
Post a Comment