येथील रेल्वे स्टेशनवर तालुकावासीयांना आवश्यक अनेक रेल्वे गाड्यांना थांबाच नाही. अनेकवेळा खासदारांनी आश्वासन देऊन ते पाळले नाही. अशातच रेल्वे गेट तिथे उड्डाणपुल या धोरणानुसार या ठिकाणी उड्डाणपुल मंजूर झाल्याचे समजते. परंतु या घोषणोला वर्ष संपत आले असताना रेल्वे उड्डाणपुलाबाबत कुठलीही कारवाई तिथे झालेली दिसून येत नाही. त्यामुळे दिवसातून अनेक वेळा रेल्वे गेट बंद असल्याने प्रवाशांना या ठिकाणी ताटकळत राहावे लागत आहे. अनेकवेळा तब्बल ४ रेल्वेगाड्या या ठिकाणावरुन जात असल्यामुळे २० ते ३० मिनिटपर्यंत गेट उघडण्याची प्रतीक्षा प्रवाशांना करावी लागते. याचा फटका अनेकवेळा गंभीर रुग्णांना ही बसत आहे, तर अनेक विद्यार्थी उशीरा शाळा, महाविद्यालयात पोहोचत आहे. सध्या ऊन वाढत असल्याने गेटवर अडकलेल्या प्रवाशांचे मोठे हाल होत असून केव्हा एकदाचे उड्डाण पुल बनते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sunday, March 5, 2017
चांदूरवासीयांना रेल्वे उड्डाणपुलाची प्रतीक्षा -तब्बल अर्धा-अर्धा तास उघडत नाही रेल्वे फाटक
Posted by vidarbha on 5:02:00 PM in चांदूर रेल्वे- (शहेजाद खान ) - | Comments : 0
चांदूर रेल्वे- (शहेजाद खान ) -
चांदूर रेल्वे नाव असलेल्या शहराला रेल्वे वाहतुकीची सुविधा व्हायची तर तिच डोकेदुखी बनत आहे. अनेक वर्षांपासूनची रेल्वे थांब्याची मागणी दुर्लक्षित असताना आता रेल्वे फाटकाचाही मनस्ताप शहरवासीयांना सहन करावा लागत आहे. रेल्वे गेट बंद झाल्यावर तब्बल अर्धा-अर्धा तास ते उघडत नसल्याची स्थिती सोनगावकडे जाणार्या रेल्वे गेटची आहे.
येथील रेल्वे स्टेशनवर तालुकावासीयांना आवश्यक अनेक रेल्वे गाड्यांना थांबाच नाही. अनेकवेळा खासदारांनी आश्वासन देऊन ते पाळले नाही. अशातच रेल्वे गेट तिथे उड्डाणपुल या धोरणानुसार या ठिकाणी उड्डाणपुल मंजूर झाल्याचे समजते. परंतु या घोषणोला वर्ष संपत आले असताना रेल्वे उड्डाणपुलाबाबत कुठलीही कारवाई तिथे झालेली दिसून येत नाही. त्यामुळे दिवसातून अनेक वेळा रेल्वे गेट बंद असल्याने प्रवाशांना या ठिकाणी ताटकळत राहावे लागत आहे. अनेकवेळा तब्बल ४ रेल्वेगाड्या या ठिकाणावरुन जात असल्यामुळे २० ते ३० मिनिटपर्यंत गेट उघडण्याची प्रतीक्षा प्रवाशांना करावी लागते. याचा फटका अनेकवेळा गंभीर रुग्णांना ही बसत आहे, तर अनेक विद्यार्थी उशीरा शाळा, महाविद्यालयात पोहोचत आहे. सध्या ऊन वाढत असल्याने गेटवर अडकलेल्या प्रवाशांचे मोठे हाल होत असून केव्हा एकदाचे उड्डाण पुल बनते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
येथील रेल्वे स्टेशनवर तालुकावासीयांना आवश्यक अनेक रेल्वे गाड्यांना थांबाच नाही. अनेकवेळा खासदारांनी आश्वासन देऊन ते पाळले नाही. अशातच रेल्वे गेट तिथे उड्डाणपुल या धोरणानुसार या ठिकाणी उड्डाणपुल मंजूर झाल्याचे समजते. परंतु या घोषणोला वर्ष संपत आले असताना रेल्वे उड्डाणपुलाबाबत कुठलीही कारवाई तिथे झालेली दिसून येत नाही. त्यामुळे दिवसातून अनेक वेळा रेल्वे गेट बंद असल्याने प्रवाशांना या ठिकाणी ताटकळत राहावे लागत आहे. अनेकवेळा तब्बल ४ रेल्वेगाड्या या ठिकाणावरुन जात असल्यामुळे २० ते ३० मिनिटपर्यंत गेट उघडण्याची प्रतीक्षा प्रवाशांना करावी लागते. याचा फटका अनेकवेळा गंभीर रुग्णांना ही बसत आहे, तर अनेक विद्यार्थी उशीरा शाळा, महाविद्यालयात पोहोचत आहे. सध्या ऊन वाढत असल्याने गेटवर अडकलेल्या प्रवाशांचे मोठे हाल होत असून केव्हा एकदाचे उड्डाण पुल बनते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment