BREAKING NEWS

Thursday, April 27, 2017

सचिवाच्या दुर्लक्षामुळे ग्राम दिलावरपुर (बगरा ) झाले भकास

चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )


तालुक्यातील मांडवा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या दिलावरपुर (बगरा ) हे गाव ग्रामपंचायत सचिवाच्या दुर्लक्षामुळे भकास झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.





    चांदुर रेल्वे शहरापासुन दिलावरपुर (बगरा) हे गाव ५ कि.मी. अंतरावर असुन मांडवा ग्रामपंचायत अंतर्गत येते. मात्र ग्रामपंचायत सचिवांनी या गावाकडे पुर्णत: दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. कारण गावात अनेक दिवसांपासुन नियमीत पाणीपुरवठा होत नसुन गावकऱ्यांना भर उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कित्येक महिन्यांपासुन गावातील नाल्यांची साफसफाई झालेली नसुन गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच गावातील एका छोट्या पुलावर गड्डा पडला असु  तो अपघाताला आमंत्रन देत आहे. यांसारख्या अनेक समस्यांनी या गावाला ग्रासले असुन सचिव मात्र झोपेचे सोंग घेत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यांच्या अशा गलथान कारभारामुळे चांगले गाव भकास झाले आहे. तरी वरीष्ठांनी याकडे तातडीने लक्ष देऊन समस्या निकाली काढण्याची मागणी गावकरी करीत आहे..

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.