चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )
नोटाबंदीचे ५० दिवस संपल्यानंतर आतातरी रोखीचा पुरवठा सुरळीत होईल, ही सर्वसामान्यांची आशा धुळीला मिळाली आहे. तालुक्यातील घुईखेड येथे असलेले स्टेट बँकेचे एटीएम रोखीविना कोरडे आहेत. त्यामुळे आता हे एटीएम कुत्र्यांच्या विश्रांतीचे ठिकाण बनले आहे.
चांदुर रेल्वे पासुन १७ कि.मी. अंतरावर असलेल्या घुईखेड या गावात स्टेट बँक ऑफ इंडीयाचे एकमेव एटीएम आहे. या एटीएमवर घुईखेडसह आजुबाजुचे टिटवा, जावरा, मांजरखेड, दानापुर, निमगव्हाण यांसह जवळपास १५ गावे अवलंबुन आहे. मात्र या एटीएममध्ये तब्बल १५-१५ दिवस पैसेच नसतात. स्टेट बँकेच्या गलथान कारभारामुळे ग्राहक पहिलेच त्रस्त असतांना एटीएम मध्येही पैसे नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. पैसे नसल्यामुळे बेवारस स्थितीत असलेले एटीएमचे ठिकाण आता कुत्र्यांच्या विश्रांतीचे ठिकाण झाले आहे. एटीएमजवळ कुत्र्यांचा मुक्त संचारही सुरूच असतो. यावरून स्टेट बँक व्यवस्थापकाचे याकडे कीती लक्ष आहे हे दिसुन येत आहे. त्यामुळे स्टेट बँक व्यवस्थापकांनी याकडे लक्ष देऊन ग्राहकांना होणाऱ्या त्रासापासुन मुक्त करावे अशी मागणी जोर धरत आहे..
Thursday, April 27, 2017
घुईखेड येथील स्टेट बँकेचे एटीएम झाले कुत्र्यांच्या विश्रांतीचे ठिकाण एटीएममध्ये खडखडाट, ग्राहक त्रस्त
Posted by vidarbha on 8:56:00 PM in चांदुर रेल्वे - (शहेजाद खान ) | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment