BREAKING NEWS

Thursday, April 27, 2017

इंदूमिलच्या संपूर्ण साडेबारा एकर जमिनीचा सातबारा राज्य शासनाच्या नावावर – राजकुमार बडोले


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक येत्या तीन वर्षात उभे रहाणार
मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – इंदूमिलची संपूर्ण साडेबारा एकर जमिन राज्य शासनाच्या नावावर झालेली असून त्यावरील पाडकामही पूर्ण झाले. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी ग्लोबल टेंडरिंगची नोटीसही काढण्यात आलेली आहे. ग्लोबल टेंडरिंच्या निकषाप्रमाणे येत्या दोन महिन्यात टेंडर फायनल झाल्यानंतर स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल आणि येत्या तीन वर्षात दिमाखदार स्मारक उभे राहील, असा ठाम विश्वास सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला.

काल मंगळवारी बडोले यांनी इंदूमिलच्या जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत स्मारकाचे वास्तूविशासद शशी प्रभू, मुंबई महनगर विकास प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. जागेची पहाणी केल्यानंतर प्रसार माध्यमांसोबत बोलत बडोले बोलत होते. ते म्हणाले, की इंदूमिलची साडेबारा एकर जमिन राज्य सरकारकडे 18 मार्च रोजीच हस्तांतरित झालेली असून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी यासंबंधीची कागदपत्रे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केलेली आहेत. आणि जमिनीचा प्रत्यक्ष ताबा 25 मार्च रोजी एमएमआरडीएने घेतला आहे. त्यामुळे जमिनीचा ताबा आणि क्षेत्रफळाविषयी जनतेच्या मनात असलेला संभ्रम दूर झाला असल्याचे बडोले म्हणाले. येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचा आराखडा जाहीर झाल्यानंतर अनेक आंबेडकरी अनुयायांनी त्यावर आक्षेप घेतल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी माझ्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती स्थापून सर्वमान्य आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपवली. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाप्रमाणे मी सर्व आंबेडकरी अनुयायांसोबत अनेक बैठका घेतल्या. सर्वमान्य आराखडा तयार करून मुख्यमंत्र्याकडे सुपूर्द केला. त्यामुळे आता तब्बल साडेतीनशे फुटाचा भव्य दिव्य असा पुतळा उभारला जाणार आहे. असे भव्य पुतळे उभारण्याचा अनुभव आपल्याकडे नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय टेंडर काढावे लागले. त्यासाठी साडे पाचशे कोटी रूपयांची तरतूदही करण्यात आली आहे, असेही बडोले यावेळी म्हणाले. मध्यंतरी काही प्रसार माध्यमांनी केवळ सात एकरावरच स्मारक उभे राहिल असे दिशाभूल करणारे वृत्तांकन केले होते. मात्र वस्तूस्थिती तशी नाही. यातील पाच एकर जमिन सीआरझेडमध्ये येत होती मात्र केंद्र शासनाने 5 जानेवारी 2017 रोजी यासंबंधीची अधिसूचना काढून संपूर्ण साडेबारा एकर जमिन स्मारकासाठी हस्तांतरित केली आहे. त्याबदल्यात आवश्यक टिडीआर राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळास दिला आहे. त्यामुळे संपूर्ण साडेबारा एकर जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक साकारणार असल्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये आनंदाचे भरते आले असून याकामात माझा हातभार लागल्यामुळे मी फारच समाधानी आहे, असेही बडोले म्हणाले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.