Sunday, April 16, 2017
आज अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे जळगावात अधिवेशन
Posted by vidarbha on 3:00:00 AM in चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )- | Comments : 0
चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )-
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघातर्फे एकदिवसीय अधिवेशनाचे आज दि.16 एप्रील रोजी सकाळी 11.30 वाजता कांताई सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. पत्रकारीता क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या जवळपास 55 पत्रकारांना नवरत्न दर्पण पुरस्कर जाहिर करण्यात आला असुन त्यांचा आज सत्कार होणार आहे. या करीता चांदुर रेल्वे तालुक्यातील पत्रकार बांधव जळगावला रवाना झाले आहे.
ग्रामीण पत्रकार संघातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या एकदिवसीय अधिवेशनाचे उद्घाटन जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या हस्ते होणार आहेत. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन तर प्रमुख अतिथ म्हणून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जि.प. अध्यक्षा उज्वला पाटील, खा. ए.टी. नाना पाटील, खा. रक्षा खडसे, आ. राजूमामा भोळे, आ. डॉ. सतिश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आ. संजय सावकारे, महापौर नितीन लढ्ढा, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, पोलिस अधिक्षक डॉ. जलिंदर सुपेकर, नरेश खंडेलवाल,आ. हरिभाऊ जावळे, आ.उन्मेष पाटील, आ. शिरीष चौधरी, आ. किशोर पाटील, माजी आ. साहेबराव पाटील, माजी आ.डॉ. गुरुमुख जगवाणी, धुळे येथील महापौर कल्पना महाले, जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, उपमहापौर ललित कोल्हे, कैलास चौधरी, सुनिल महाजन, जि.प. सदस्य पवन सोनवणे, रजनीकांत कोठारी, अशोक नागराणी,डॉ. परीक्षीत बाविस्कर, डॉ. जगमोहन छाबडा, डॉ. लक्ष्मीकांत शास्त्री, डॉ. संजय महाजन आदी उपस्थित राहणार आहे.
दरम्यान आयोजीत करण्यात आलेल्या अधिवेशानात पुणे येथील जेष्ठ पत्रकार विजय बाविस्कर, विजय चोरमारे, विक्रांत पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावेळी पत्रकारांसाठी करण्यात आलेल्या विविध ठराव यावेळी मंजूर करण्यात येणार असून त्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या अधिवेशनाकरीता चांदुर रेल्वे येथील अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेचे विदर्भ कार्यकारी अध्यक्ष युसुफ खान, तालुकाध्यक्ष गुड्डु उर्फ प्रविण शर्मा, उपाध्यक्ष धिरज नेवारे, सचिव प्रा. रविंद्र मेंढे, जिल्हा निरीक्षक बाळासाहेब सोरगिवकर, संजय मोटवानी, इरफान पठान, मंगेश बोबडे, मधुकर बावने, अमर घटारे, हनुमंत मेश्राम, सुभाष कोटेचा आदी पत्रकार शनिवारी दुपारी जळगाव करीता रवाना झाले व रविवारी होणाऱ्या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहे..
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment