* खरीप हंगाम आढावा बैठक
*7 लक्ष 28 हजार हेक्टर एकुण खरीप पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र
अमरावती– येत्या खरीप हंगामापासुन रासायनिक खतविक्रीकरीता जिल्हयात थेट लाभ हस्तांतरण प्रकल्प येत्या 1 जुनपासुन राबविण्यात येणार आहे.आतापर्यत खतउत्पादक कंपन्यानी जेवढी खतनिर्मीती केली व विक्री केंद्राना खत वितरीत केले त्यानुसार कंपन्याना अनुदान देण्यात येत होते. मात्र आता या प्रकल्पाच्या माध्यमातुन खत खरेदी केले त्या आधारावरच खत उत्पादक कंपनीला अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे शासनाच्या निधीमध्ये मोठी बचत होणार आहे मात्र शेतकऱ्यांना खत खरेदी करतांना स्वतच्या आधार कार्डाचा वापर करणे आवश्यक आहे अशी माहिती पालकमंत्री प्रविण पोटे यांनी आज दिली.
नियोजन भवन येथे आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीत ते बोलत होते.या बैठकीला आमदार सर्वश्री विरेंद्र जगताप,रमेश बुदींले,डॉ.अनिल बोंडे ,जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेसी,विभागीय कृषी अधिकारी चव्हाळे,जिल्हा कृषी अधिक्षक दत्तात्रय मुळे ,आत्मा संचालक मिसाळ उपस्थित होते.
यासाठी खरेदीदार शेतकऱ्याचा आधार क्रमांक,त्यास आवश्यक खताचे विवरण या नोंदी खत विक्रेत्याने पीओएस मशीनवर नोंदवायच्या आहेत.या नोंदीसाठी खरेदीदार शेतकऱ्यांने स्वतच्या हाताचा बोटाचा ठसा मशीनवर दयायचा आहे.पिओएस मशीनव्दारे ही सिमकार्ड/इंटरनेट व्दारे आधार लिंक करण्यात आलेली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचा आधार क्रमांकाची ओळख पटल्यानंतर खत खरेदी करता येईल.जिल्हयातील 1002 खत विक्रेत्याकडे या मशीन उपलब्ध करुन दिल्या असुन त्यांना याबाबतीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी मुळे यांनी दिली.
2017-18 या वर्षामध्ये खरीप पिकाचे 7 लक्ष 28 हजार हेक्टर एकुण लागवडीखालील क्षेत्र असुन कापुस पिकाच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याचा अंदाज व्यकत् करण्यात आला .गेल्या वर्षी कापुस पिकाचे क्षेत्र 1 लाख 81 हजार 392 हेक्टर होते.ते यावर्षी 2 लाख 10 हजार हेक्टर होणार आहे.मागील वर्षाच्या तुलनेत सोयाबीन आणि तुर पिकाच्या लागवडीत घट होणार आहे.विविध पिकांकरीता बियाण्याची मागणी नोंदविण्यात आली असुन 1 लक्ष 41 हजार किवटंल बियाणे मागविण्यात आले आहे.त्याचबरोबर खरीप हंगामासाठी 1 लक्ष 45 हजार 550 मेट्रीक टन खतांची मागणी करण्यात आली आहे.यावेळेस खताचा तुटवडा भासणार नाही असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिका-यांनी सांगीतले .
2 लक्ष 37 हजार 654 मृदा आरोगय पत्रीका शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आल्या असुन 2017 -18 व 2018-19 करीता 1 लक्ष 2 हजार 910 लक्षांकाचे उदीष्ट आहे. यावर्षी शेतकऱ्यांना 1 लाख 941 कोटी रुपये पिककर्जासाठी लक्षांक ठेवण्यात आला आहे.
कृषीसमन्वयीत समृध्दी प्रकल्पाअंतर्गत अनेकांकडुन तक्रारी प्राप्त् झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाची चौकशी करण्यासाठी आमदार विरेंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली समीती गठीत करण्याचा निर्णय पालकमंत्रयानी यावेळेस जाहीर केला.तसेच सिंचन ,कृषी,आत्मा,महसुल,विदयुत वितरण,आरोगय या विभागांचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक महिन्यातील चौथ्या आठवडयात बैठक घेण्यात येईल यामध्ये सर्व आमदारांना आमंत्रीत करण्यात येईल.
एकात्मीक फलोत्पादन विकास अभियानातंर्गंत जिल्हयातील संत्रा बागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी 130 हेक्टरचा लक्षांक वाढविण्याची तसेच पॅक हाऊस, शेडनेट इत्यादीची लक्षांक वाढविण्याची मागणी आमदार अनिल बोंडे यांनी केली केली. गारपीटीसारख्या नैसर्गीक आपत्तीचे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही तसेच मग्रारोहयो मधुन बांधण्यात आलेल्या कुशलकामांचा निधी अजुन मिळाला नाही त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा असे आमदार विरेंद्र जगताप यांनी सांगीतले.
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना आणि प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ शेतक-यांनी मोठया प्रमाणात घेण्याचे आवाहन या बैठकीच्या माध्यमातुन पालकमंत्रयानी केले.कृषी ,आत्मा व सिंचन विभागातील रिक्त पदांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.यावेळी पिक उत्पादक स्थैर्य राखत उत्पादन खर्चात बचत पुस्तीका ,मागेल त्याला शेततळे योजनेची पुस्तीका,सिंचन आराखडा व आत्मा संबधीत योजनांची माहिती पुस्तीका आदीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
Post a Comment