अलिबाग (जिमाका):-
रायगड जिल्हयातील ज्या नागरिकांनी आपले आधार नोंदणी केली नसेल त्यांनी ती जवळच्या आधार नोंदणी केंद्रामध्ये जाऊन करावी. नवीन आधार नोंदणीसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
आधार नोंदणीमध्ये काही बदल करावयाचे असतील तर युआयडीएआयने (UIDAI)ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच संबंधितांना शुल्क दयावे. युआयडीएआयचे दर खालील प्रमाणे आहेत.
नवीन आधार नोंदणी विनामुल्य आहे. डीमोग्राफीक/बायोमॅट्रीक सुधारणा (बदल) करण्यासाठी रुपये 25/- आहे. 5 ते 15 वयोगटातील आवश्यक बायोमॅट्रीक सुधारण्याकरिता (बदल) कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही.जिल्हयातील सर्व नागरिकांनी आपली आधार नोंदणी करावी असे आवाहन नेटवर्क पिपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजिस यांच्या मार्फत करण्यात आली आहे.
Saturday, April 15, 2017
नागरिकांना आधार नोंदणी करण्याचे आवाहन
Posted by vidarbha on 9:40:00 PM in अलिबाग (जिमाका):- | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment