Saturday, April 15, 2017
आजेगांव येथे आग लागुन शेतीपयोगी साहीत्य व कडबा जळाल्याने शेतकरयाचे हजारो रुपयाचे नुकसान
Posted by vidarbha on 8:52:00 PM in महेन्द्र महाजन जैन / रिसोड - | Comments : 0
महेन्द्र महाजन जैन / रिसोड -
सेनगांव:- तालुक्यातील एकनाथ गजेंद्र चोंडकर यांच्या शेतातील गोठ्यालगत दि.१४ एप्रिल शुक्रवारी ०२-३० च्या सुमारास आग लागुन ३५ हजार रुपयाचे नुकसान झाल्याची घटना घडली.
आजेगांव येथील माजी शिवसेना तालुकाप्रमुख एकनाथ चोंडकर याच्या गट क्रमांक ५४४ या शेतात दि.१४ एप्रिल शुक्रवार रोजी दुपारी ०२-३० च्या सुमारास गोठ्या लगत आग लागल्याने गवताच्या चार हजार पेंढ्या, सोयाबीनचे कुटार, शेतीपयोगी साहीत्य व लगतच गोठा असल्याने गोठ्यावरील तिन पत्रे आगीत जळुन खाक झाल्याने एकनाथ चोंडकर यांचे ३५ हजाराचे नुकसान झाल्याची माहीती आजेगाव सज्जाचे तलाठी श्रीराम वाघ यांनी तेज न्युज हेडलाईन्स च्या प्रतिनीधीशी दिली. हि घटना समजताच घटनास्थळाला तलाठी वाघ यांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment