BREAKING NEWS

Monday, April 17, 2017

प्रभुरामचंद्राची जन्मभुमी काही दृष्ट लोकांनी अधीग्रहीत केली आहे ती आम्हाला मुक्त करायची आहे -प.पु.श्री.श्री.आचार्य जितेंद्रनाथ महाराज



विश्वहिंदु परीषद व बजरंग दल यांचे संयुक्त विद्यमाने अचलपूर परतवाडा नगरीत भव्य संकल्प सभा संपन्न




अचलपूर / विशेष प्रतिनिधी /-
 अयोध्येच्या रामजन्मभुमी  येथे राममंदिर निर्माण हेतु संपूर्ण देशात रामभक्त विश्वहिंदू परीषद व बजरंग दल यांचे मार्गदर्शनाखाली संकल्प घेण्याचे ठरवले आहे याअनुशंगाने संत मंडळी देशभर संकल्प सभा घेऊन हिंदू जनजागृती करीत आहे.


       याच हेतूने १५ एप्रिल रोजी स्थानीक तिलक चौक येथे सुनिल खानझोडे यांच्या अध्यक्षतेखाली भव्य संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी अंजनगाव सुर्जी येथील मठाधिपती प.पु.श्री.श्री.आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांनी अयोध्येच्या रामजन्मभुमी बद्दल समस्त हिंदू चा आग्रह का यावर सविस्तर माहिती उपस्थीत रामभक्तांना सांगितले ते म्हणाले की काही लोक म्हणतात की गावातल्या मंदिराकडे पहा अयोध्येच्या राम मंदिर चे काय घेवून बसलात तेंव्हा त्यांना सांगू इच्छितो की आम्ही राममंदिर तर प्रत्येक गावात बनवू शकतो पण अयोध्येला राममंदिर आम्हाला बांधायचे नाही प्रभुरामचंद्राची जन्मभुमी जी काही दृष्ट लोकांनी अधीग्रहीत केली आहे ती आम्हाला मुक्त करायची आहे या करिता आम्हाला आमच्या जिवाचे बलिदान करावे लागले तरी चालेल.आम्ही राज्यघटनेचा व भारतीय न्याय व्यवस्थेचा सन्मान करतो.



कोणतेही सरकार मंदिर बांधत नसते मंदिर किंवा जन्मभुमी कुणाला बांधण्याची त्याचा विचार करण्याची गरज नाही प्रभुरामचंद्र आपल्या या बजरंगी व भक्तांच्या माध्यमातून ते कार्य करून घेईल.जसे विवादीत ढाचा गोष्टीगोष्टीत नष्ट झाला तसेच रामजन्मभुमीची निर्मिती होवून जाईल कुणाला कळणार सुध्दा नाही.रामजन्म भुमी होती,आहे व तेथेच राहणार हे तेवढेच सत्य जेवढे सुर्य चंद्र असल्याचे स्पष्ट आहे.बोलतांना त्यांनी आज आमच्या वर जे निर्बंध प्रशासनाने घालत आहे जणु आम्ही आतंकवादी आहोत पण त्यांनी हे समजून घ्यावे की हा भगवा ध्वज व वस्त्र आतंक चे प्रतीक नाही तर उज्वल भविष्याची चाहुल आहे याचे प्रतीक उत्तरप्रदेशाच्या बहुमतातील नेतृत्वाने सिध्द केले आहे आज तेथे योगी आदित्यनाथ आहेत व मी जितेंद्रनाथ असे घोषित करतो की भव्य राममंदिर तर तेथेच बनेल.कार्यक्रमाला अटलजी पांडे,संतोष गहुरवार,सागर खेडकर,सुर्यकांत जयस्वाल,अरूण घोटकर,रामजी बघेल,विलास बेलसरे,अशोक मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक बजरंग दल अचलपूर जिल्हा संघटक पवन जडीये यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन रामलाल मंडले,कमलेश भागोले,लखन भिडे,गजानन इचे,वैशाली चंदनपत्री,गणेश अग्रवाल,सुमती होरे,विजय वडनेरकर यांनी प्रकाश महाराज कठाळे व पवन जडीये यांचे मार्गदर्शनाखाली केले .कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अरूण दिक्षीत,योगेश अग्रवाल,गुड्डू मिश्रा,सुरज अहिर,बाजीराव देशमुख,गजानन हूरपंड,संदीप राजगूरे,सागर लहाड,नितीन रायपूरे,कृष्णाजी मालवीय,आलोक आकोलकर,विरेंद्र रायपूरे व समस्त विश्वहिंदू परीषद,बजरंग दल च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला असंख्य नागरीक व रामभक्त उपस्थित होते परतवाडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार किरण वानखडे,अचलपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी ऊपविभागीय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवून शांततेत संकल्प सभा संपन्न केली.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.