नवी देहली –
१२ एप्रिल या दिवशी १६ व्या लोकसभेच्या अध्यक्षा श्रीमती सुमित्रा महाजन यांची त्यांच्या वाढदिवसानिमित्त सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अभय वर्तक आणि हिंदु जनजागृती समितीच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी सनातनचा ‘देव नदी गंगा की महिमा’ हा हिंदी ग्रंथ भेट दिला. त्यांना महर्षि आध्यात्मिक विश्वविद्यालयाच्या संदर्भात माहिती देण्यात आली. तसेच सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात येण्याचे आमंत्रण दिले.
सनातन संस्थेचा ग्रंथ पाहून श्रीमती महाजन म्हणाल्या की, या संस्थेने प्रकाशित केलेले अन्य ग्रंथही माझ्याकडे आहेत.
ग्रंथावर प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र पाहून त्या म्हणाल्या, ‘‘मी यांना ओळखते. त्यांच्या इंदूर येथील भक्तवात्सल्य आश्रमाला अर्पणही करण्याची संधी मिळाली होती.’’
Post a Comment