जिल्हा प्रतिनिधी / महेंद्र महाजन जैन -

वाशीम - रविवार, 30 एप्रिल रोजी सिव्हील लाईन परिसरातील पोलीस ग्राऊंड येथे आयोजीत आदी शंकराचार्य जयंती महोत्सवाच्या जागेचे भूमिपूजन येवता येथील परमपुजनिय शांतीपुरी महाराज यांच्या हस्ते मंगळवार, 25 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले. यावेेळी भूमिपूजनाच्या जागेवर रितसर पुजाविधी व धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. यावेळी बोलतंाना शांतीपुरी महाराज यांनी हा जयंतीचा कार्यक्रम लोकोत्सव व्हावा अशी अपेक्षा करुन सर्व समाजातील लोकांनी यामध्ये सहभाग घेवून हा कार्यक्रम खर्या अर्थाने यशस्वी करण्याचे आवाहन केले. तर श्रीकृष्ण पाटील म्हणाले की, आपल्या वाशीम शहरात हा भव्य दिव्य असा कार्यक्रम साजरा होणे हे आपले भाग्य असून याचे आपण सोने केले पाहीजे. हा जयंतीचा कार्यक्रम खर्या अर्थाने संत महंतांचा मेळावा असून वाशीम नगरीत या संतांचे आगमन हे आपले अहोभाग्य आहे. तेव्हा सर्वानी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. तर नगराध्यक्ष अशोक हेडा म्हणाले की, जयंतीच्या अनुषंगाने शहरात विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून नगर परिषद प्रशासनाच्या वतीने कार्यक्रमासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल. या भूमिपूजन कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये ज्ञानानंद सरस्वती महाराज, ऍड. विजय जाधव, प्रा. दिलीप जोशी, माजी आमदार डॉ. भिमराव कांबळे, माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरु, नगराध्यक्ष अशोक हेडा, लक्ष्मणराव इंगोले, किरणराव सरनाईक, श्रीकृष्ण पाटील, डॉ. निलीमा घुनागे, बापु ठाकुर, उत्तम पोटफोडे, गौतम सोनुने, गजानन भांदुर्गे, माणिक देशमुख, दिलीप काष्टे, सौ. संगीता पिंजरकर, राहुल तुपसांडे, सुर्यप्रकाश दहात्रे, वसंतराव धाडवे, हरिष औंधीया, प्रकाश बज, कपिल सारडा, अनंता रंगभाळ, सुनिल तापडीया, सुरेश लोध आदींसह कार्यकर्ते, नागरीक व महिला भगिनींची बहूसंख्येने उपस्थिती होती. प्रास्ताविक ऍड. विजय जाधव यांनी तर संचालन प्रा. दिलीप जोशी यांनी केले. तर उपस्थितांचे आभार ऍड. किरणराव सरनाईक यांनी मानले.
Post a Comment