चांदुर रेल्वे- (शहेजाद खान )
नाफेडने खरेदी केलेल्या तुरीचे पैसे शेतकऱ्यांना लवकर मिळत नाही आहे. एक महिन्या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी नाफेडला तूर विकली त्या तुरीची रक्कम शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मिळाली नाही. नाफेडने खरेदी केलेल्या तुरीची रक्कम शेतकऱ्यांना त्वरीत द्यावी या मागणीचे पत्र जनता दल सेक्युलरचे प्रदेश अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. पांडुरंग ढोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.
भारत हा शेतीप्रधान देश असतांना शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांसमोर
हे एक संकटच उभे असून त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्याना तोंड द्यावे लागते. शेतकऱ्यांना उन्हाळ्यात शेती मशागतीची कामे,कोणाला आपल्या मुला मुलीचे लग्न ,कुणाला नातेवाईकाचे तर कुणाला बँकेचे देणे असते त्यासाठी त्यांना पैशाची अत्यंत गरज असून त्यांचेच पैसे त्यांना वेळेवर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने व्यापा-यांना आपली तूर ४ हजार रुपये प्रति क्विंटल भावाने विकावी लागते. तीच तूर व्यापारी शेतकऱ्यांच्या नावाने नाफेडला देतात. अशा प्रकारे व्यापारी एका क्विंटलवर ८०० ते ९०० रूपये नफा मिळवतो. ज्याचा माल त्याचेच हाल व्यापारी बनले मालामाल हि परिस्थिती निर्माण झाल्याचे मत डॉ. पांडुरंग ढोलेंनी व्यक्त केले. हे सगळे घडत आहे ते नाफेडच्या सदोश व अत्यंत धीम्या गती कामाच्या पद्धततीमुळे त्याची झड शेतकऱ्यांना सहन करावी लागते.
तरी सरकारने नाफेडला लवकरात पैसा उपलब्ध करून शेतकऱ्यांनवर होत असलेला अन्याय दूर करावा व नाफेडने खरेदी केलेल्या तुरीची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित दयावी अशी मागणी जनता दल सेक्युलर प्रदेश अध्यक्ष तथा माजी डॉ.पांडुरंग ढोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवुन केली आहे.
Post a Comment