Monday, April 17, 2017
जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींना तंटामुक्त गाव पुरस्कार
Posted by vidarbha on 8:07:00 AM in महेन्द्र महाजन जैन / रिसोड - | Comments : 0
महेन्द्र महाजन जैन / रिसोड -
वाशिम: महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायती तंटामुक्त गाव पुरस्कारासाठी पात्र ठरल्या आहेत. या ग्रामपंच्यातींना ईसीएस प्रणालीद्वारे बक्षिसाची रक्कम वितरीत करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी कळविले आहे.
तंटामुक्त पुरस्कारास पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतीमध्ये वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावंगा जहांगीर व रिठद, रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत एखलासपूर, आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत इचोरी, कळंबाबोडखे, चिखलागड व फाळेगाव या ग्रामपंचायतींचा समवेश आहे. मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धानोरा घाडगे (बु.), वरोली व सावळी, मंगरूळपीर पोलीस स्टेशन अंतर्गत जोगलदरी, जुनापानी यासह जऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत कार्ली, किनखेडा, हनवतखेडा व सोनाळा वाकापूर या ग्रामपंचायतीही तंटामुक्त गाव पुरस्कारास पात्र ठरल्या आहेत.
तंटामुक्त गाव पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींकरिता एकूण २९ लक्ष रुपये बक्षिसांची रक्कम प्राप्त झाली आहे. ही रक्कम ईसीएस प्रणालीद्वारे संबंधित ग्रामपंचायतींना वितरीत केली जाणार आहे. याकरिता ग्रामपंचायतींनी बँकेचे नाव, खाते क्रमांक व आयएफएससी कोड (IFSC Code) आदी माहिती तत्काळ संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांच्याकडे द्यावी, असे श्री. होळकर यांनी कळविले आहे. तसेच सन २०१६-१७ वर्षातील मोहिमेमध्ये सहभागी गावांमधील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व सदस्य यांनी उत्साहाने व जोमाने काम करून आपले गाव तंटामुक्त करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment