अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-
नवीन घर किंवा वास्तू म्हटलेकी वास्तूपुजन आलेच तसेच दुकान,दवाखाना अथवा प्रतिष्ठान म्हटले की उदघाटन आलेच.वास्तुपूजन म्हटले की हवनपुजन सर्व नातेवाईक व मित्रमंडळी यांच्या जमाव करून जेवणावळी करून परतभेटी मिळवून आपल्या कौतुकाचे पोवाडे एकने तर उदघाटन म्हणजे राजकीय नेते मंडळी,आमदार व खासदार यांना बोलावून भाषणबाजी आलीच पण हे काहीच न करता. आपल्या दवाखान्याचे उदघाटन व गृहप्रवेश एका अनोख्या पद्धतीने अचलपूर शहरात झाला.
डाँ.अमर मते पाथर्डी अकोट येथील रहिवासी गेल्या चार वर्षांपासून गांधी पूल येथे एका छोट्याशा नगरपालिकेच्या भाड्याचे दुकानात आपला दवाखाना चालवत होते.घरची अत्यंत साधारण परिस्थिती पण मेहनत करण्याची जिद्द शहरातील नामवंत डाँक्टरांचे मार्गदर्शनाखाली आपली सेवा देत.बेगमपूरा येथे खुली जागा घेऊन स्वकष्टाने व वडील,आई,भाऊ व बहीणी यांचे
सहकार्याने भव्य दवाखाना व निवासाकरीता घर उभारले.परंपरेने दवाखान्याचे उदघाटन व गृहप्रवेश आलाच पण कोणत्याही पारंपारिक पद्धतीने हे कार्य नकरता विलायतपूरा येथील मूकबधिर व मतीमंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना भेट वस्तू देवून त्यांचा आदरसत्कार करून त्यांच्या विशेष उपस्थितीत डाँ.सुरेश ठाकरे यांचे प्रमुख उपस्थितीत आपले आई उषाताई व वडील शालीग्रामजी मते यांचे हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे संचलन
व-हाडी कवी गजानन मते यांनी केले याप्रसंगी शहरातील व त्यांच्या गावातील असंख्य मित्रमंडळी व नागरिक उपस्थित होते याप्रसंगी मूकबधिर मुलांना सन्मान पुर्वक भोजन देवून नंतर उपस्थीत नागरीक व नातेवाईकांना भोजन देवून डाँ.अमर मते यांनी आपल्या आईवडिलाप्रती असणारे प्रेम व असलेली सामाजिक जान दाखवून एक आदर्श तर निर्माण केलाच पण येणा-या पिढीला एक संदेश देऊन नव्या वाटचालीचा मार्ग सुध्दा दाखवला या त्यांच्या कार्यात अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेला त्यांचा भाऊ निलेश,बहिणी,जावई व समस्त नातेवाईक यांनी त्यांना खंबीरपणे समर्थन देवून सहकार्य केल
Saturday, April 1, 2017
मूकबधिर मुलांच्या हस्ते मते हास्पीटलचा शुभारंभ
Posted by vidarbha on 8:18:00 AM in अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /- | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment