जिल्हा प्रतिनिधि / महेन्द्र महाजन -
वाशिम-वाशिम जिल्ह्यातील वारला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला वैद्यकिय अधिकारी यांनी महिला आशा सेविकेसह गट प्रवर्तकाचा गेल्या 10 वर्षांपासून शारीरिक मानसिक आणि आर्थिक छळ चालविला असून आता न्याय मागावा तरी कोणाला असा टाहो त्यांनी फोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय ठिया आंदोलन छेडले जो पर्यंत वैदयकिय अधिकारी यांना निलंबित करण्यात येत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन छेडणार असल्याचा इशारा त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला दिलेल्या निवेदनातून दिला आहे वारला येथील महिला वैद्यकीय अधिकार गत 17 वर्षांपासून वारला प्राथमिक आरोग्य केंद्रावर कार्यरत असून 2009 पासून त्यानी 48 आशा सेविकाचा छळ चालविला आहे वरीस्ट अधिकाऱयांना निवेदन देऊन सुद्या एका माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या राजकीय दबावाखाली अधिकाऱ्यानी महिला अधिकाऱ्याला पाठीशी घातले आहे वारला प्राथमिक केंद्रा अंतर्गत 40 गावाचा समावेश असून 2 गट प्रवर्तक सह 48 आशा सेविका कार्यरत आहे वैद्यकीय अधिकारी महिला असून त्यांनी महिला आशा सेविकांचा शारीरिक मानसिक आणि आर्थिक छळ चालविल्याने संताप व्यक्त केल्या जात आहे आशा सेविकांना पैशाची मागणी करणे, चारित्र्यावर संशय घेणे,अपमानित करण्याची मालिका चालविली आहे वैद्यकीय अधिकारी यांचा त्रास अनावर झाल्याने आशा सेविकानी मुख्यकार्यकारी अधिकारी,जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद अध्यक्षा यांना 23 मार्चला निवेदन देऊन कार्यवाहीची मागणी केली मात्र वरिष्ठ अधिकाऱयांनी निवेदनाला केराची टोपली दाखविल्याने वैद्यकीय अधिकारी यांची हिम्मत वाढली त्यांनी तक्रार दारांना जास्तच त्रास देणे सुरु केले याबाबत 2 गट प्रवर्तकासह 48आशा सेविकानी दि 31 मार्च ला जिल्हाधिकारी कार्यालया समोर एका दिवशीय काम बंद ठिय्या आंदोलन छेडले आशा सेविकांचे एक शिष्टमंडळ जिल्हा आरोग्य अधिकारी यांना भेटायला गेले असता जिल्हा आरोग्य अधिकाऱयांनी वैद्यकीय अधिकारी यांचा स्वभाव मी बदलू शकत नसल्याचे बेजवाबदार उत्तर दिल्याने आशा सेविकानी आता न्याय मागावा तरी कोणाला असा आर्त टाहो फोडला आहे
जोपर्यंत वैद्यकीय अधिकारी यांना निलंबित करत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलनासह 2 एप्रिला पल्स पोलिओ मोहिमेवर बहिष्कार टाकन्याचा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे
Saturday, April 1, 2017
वाशिम जिल्ह्यातील वारला महिला वैदयकिय अधिकारी यांचा आशा सेविकावर अत्याचार डिएचो म्हणतात मी काय करू?
Posted by vidarbha on 8:19:00 AM in जिल्हा प्रतिनिधि / महेन्द्र महाजन - | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment