महेंद्र महाजन जैन / रिसोड -
वाशीम - सामाजीक कार्यात अग्रेसर असलेल्या तरुण क्रांती मंचच्या वतीने घोषित विविध सामाजीक पुरस्काराचे शनिवारी, 29 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता मॉ गंगा मेमोरीयल बाहेती हॉस्पीटल येथील श्री श्री रविशंकर सभागृहात वितरण करण्यात येणार आहे. सदर पुरस्काराचे वितरण केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहिर व खासदार भावनाताई गवळी यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रमाला अतिथी म्हणून जि.प. अध्यक्षा सौ. हर्षदाताई देशमुख, आमदार लखन मलीक, आमदार अमित झनक,आमदार गोपीकिशन बाजोरीया, नगराध्यक्ष अशोक हेडा, वाशीम अर्बन बँकेचे अध्यक्ष सुभाष राठी उपस्थित राहणार असल्याची माहिती तरुण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी, पुरस्कार संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. हरिष बाहेती, संयोजक अनिल केंदळे, सहसंयोजक देवेंद्र खडसे पाटील, स्वागताध्यक्ष सुरेशचंद्र कर्नावट यांनी दिली आहे.
सदर कार्यक़्रमात परमपुज्य विमलहंस विजयमुनी महाराजांना जीवनगौरव पुरस्कार, योग क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल योगाचार्य रामभाऊ छापरवाल, शिक्षण, समाजसेवा व गोसेवेत भरीव कार्य करणारे प्रा. हरिभाऊ क्षिरसागर, आनंद सब के लिए चे राज्य संयोजक व मेळघाटातील दुर्गम भागात जावून आदिवासी बांधवांच्या विकासाकरीता पुढाकार घेणारे मनिष मंत्री, अपंग बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे मनिष डांगे, प्रशासकीय कार्यात पारदर्शकता आणून विविध योजना कार्यान्वीत करणारे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, ग्राहक संरक्षण आणि हक्कासाठी झटणारे अ.भा. ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष प्रमोद गंडागुळे, वाशीम न.प. मुख्याधिकारी गणेश शेट्ये यांना सेवाव्रती पुरस्कार घोषीत करण्यात आला आहे. मालेगाव येथील अभिषेक मुंदडा व वाशीम येथील प्रविण बाहेती यांना युवा उद्योजक पुरस्कार, ग्राम तामसी येथे लोकसहभागातून कोट्यावधी रुपयाचे जलमंदिर निर्माण करणारे डॉ. सुधीर कवर यांना प्रेरणा पुरस्कार, सामाजीक कार्यात भरीव योगदान देणार्या दिगंबर जैन महिला संघटनेच्या राज्य पदाधिकारी सौ. उज्वलाताई उकळकर व इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. मायाताई गट्टाणी यांना नारीरत्न पुरस्कार तथा सर्वोत्कृष्ट सामाजीक संघटनेचा पुरस्कार शेलुबाजार येथील मारवाडी युवा मंच व मुक्या जनावरांकरीता रुग्णवाहीका सुरु करुन आदर्श निर्माण करणारे शिरपुर जैन येथील अंतरीक्ष पार्श्वनाथ संस्थान यांना सन्मानित करण्यात येणार आहे. सोबतच वेगवेगळ्या क्षेत्रात जिल्हयाचा गौरव वाढविणार्या मान्यवरांचाही सत्कार करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे
Post a Comment