Friday, April 28, 2017
स्वामी विवेकानंद संस्थेचे कार्य जिल्हयात उत्कृष्ट
Posted by vidarbha on 5:51:00 PM in महेंद्र महाजन जैन / रिसोड - | Comments : 0
महेंद्र महाजन जैन / रिसोड -
वाशीम - सामाजीक कार्यात आपल्या ठसा उमटविणार्या स्वामी विवेकानंद बहूउद्देशिय संस्थेच्या सर्व पदाधिकार्यांच्या कार्याची दखल शासनाने घेवून त्यांना पुरस्काराने गौरविले आहे. जिल्हयात स्वामी विवेकानंद संस्थेचे कार्य उत्कृष्ट असून संस्थेने आपले हे कार्य उत्तरोत्तर पुढे नेवून तळागाळातील वंचितांच्या विकासासाठी कार्य केले पाहीजे असे प्रतिपादन कारंजा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी केले.
शिरपूर येथील स्वामी विवेकानंद संस्थेला शासनाचा सन 2015-16 चा राज्यस्तरीय युवा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकार्यांचा स्थानिक पाटणी यांच्या जनसंपर्क कार्यालयात आ. पाटणी यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना आ. पाटणी म्हणाले की, युवकांनी सहकार भावनेतून एकत्र येवून संस्थेच्या माध्यमातुन क्रीडा, सामाजीक, पर्यावरण व इतर अनेक क्षेत्रात केलेले कार्य उत्कृष्ट असून या युवकांच्या कार्याचा आदर्श इतरांनी घेणे गरजेचे आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अमोल देशपांडे यांचा पाटणी यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमाला अरुण शेळके, प्रा. सुनिल काळे, प्रा. आर.टी. ब्राम्हण, विनोद जाधव, धनंजय रणखांब, रामेश्वर काटेकर, संतोष खरात, परेश व्यवहारे, सुरेश शिंदे, आकाश भारसाकळ आदींची उपस्थिती होती.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment