सजावट स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला एक चांगला संदेश
मोर्शी (अमरावती) :
महाराष्ट्राला शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने लोकमान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून यावर्षीचा प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मोर्शी येथील अभिमन्यू गणेश मंडळाला प्राप्त झाला. शासनाचे प्रथम पारितोषिक मोर्शी शहराला प्राप्त झाल्याने या मोर्शीचे नावलौकिक झाले आहे. त्यासोबतच स्वदेशी, साक्षरता, बेटी बचाव – बेटी पढाओ, व्यसनमुक्ती, जलसंवर्धनाची माहिती सुद्धा या मंडळाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात गेली असल्याने एक चांगला संदेश जनतेपर्यंत गेला आहे. याच अनुषंगाचे औचित्य साधून मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी अभिमन्यू गणेश मंडळाचे सदस्य हेमंत पाचघरे, अमोल लांडे, रोषण जयस्वाल, धीरज शिरभाते, निलेश ढोले, विजय ढोले, कुणाल बुले, पवन बिजवे, श्याम सारडे, ओम जयस्वाल, हर्षल ढोले, मयूर भून्से, मोहित लांडे, प्रीतम ढोले, योगेश जयस्वाल याच्यासह आदी मंडळाच्या कार्यकर्त्यांचा शाल – श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करून पुढील कार्याकरिता शुभेछ्या दिल्यात. यावेळी मोर्शी पंचायत समितीचे उपसभापती सुनील कडू, नगर परिषदचे बांधकाम सभापती मनोहर शेंडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष अजय आगरकर, शहराध्यक्ष दीपक नेवारे, नगरसेवक नितीन राउत, हर्षल चौधरी, रवी मेटकर, अनिकेत राउत, आदित्य बिजवे, राहुल चौधरी, निलेश जावरे, भुषण कोकाटे, भुषण कोकाटे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment