अमरावती :
जिल्यातील तिवसा व बडनेरा-भातकुली विधानसभा मतदार संघातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याना विकासकामे करण्यास अडथळा निर्माण होत आहे. परंतु वरील दोन्ही मतदार संघातील जनतेचा विचार लक्षात घेता भाजपने विस्तारक प्रभारी आमदार म्हणून मोर्शी विधानसभा मतदार संघाचे भाजपा आमदार डॉ.अनिल बोंडे यांची नियुक्ती करण्यात आली. आ.डॉ.बोंडे यांच्यावर बडनेरा भातकुली व तिवसा विधानसभा मतदार संघाची जबाबदारी सोपविल्याने आता वरील तीन हि तालुक्याला भाजपचे आमदार मिळाले असल्याने बूथ अध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आमदार डॉ.बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच तिवसा व बडनेरा/भातकुली तालुक्यातील वेगवेगळ्या दोन ठिकाणी भाजपचे बूथ अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विस्तारक तसेच संघटन चर्चा, भीम अप बाबत महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीचे सदस्य बादल कुळकर्णी, भाजपचे अमरावती कोषाध्यक्ष रविराज देशमुख, भाजपाचे भातकुली तालुकाध्यक्ष सोपान गुडधे, तिवसा गावचे दिलीपजी नारिंगे यांच्यासह आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मोर्शी विधानसभा मतदार श्रेत्राचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी भाजपच्या बैठकीला उपस्थितीत असलेले बूथ अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून भाजप सरकारने सुरु केलेल्या योजना संदर्भात त्यांना माहिती दिली, आणि शासनाची योजना हि सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा आग्रह सुद्धा उपस्थितांना केला. यावेळी आमदार डॉ. बोंडे बोलतांना म्हणाले कि, आपला मतदार संघ हा पोरका नाही, तिवसा, बडनेरा व भातकुली तालुक्यातील नागरिकांना तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्याला शासकीय कुठल्याही अडचणी येत असतील तर त्यांनी थेट माझ्याशी किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा. त्याचबरोबर आठवड्यातील पहिला दिवस म्हणजे सोमवार हा भातकुली व बडनेरा – तिवसा तालुक्यातील भाजपचे सदस्य तसेच जनतेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. यादिवशी मी स्वत: अमरावती कार्यालयात उपलब्ध राहील अशी ग्वाही सुद्धा भाजपच्या बैठकीत आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी दिली, त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीचे सदस्य बादल कुळकर्णी यांनी नव्याने सुरु झालेल्या भीम अपचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांना कैशलेश व्यवहाराबाबत अधिक महत्व समजावून सांगितले. यावेळी बैठकीला बडनेरा – भातकुली व तिवसा तालुक्यातील भाजपचे बूथ अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment